केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले मंगळवारी हाथरसला देणार भेट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसप्रकरणी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी केली दूरध्वनीद्वारे चर्चा


मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. हाथरसमधील  दलित मुलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आरोपीना कठोरात कठोर शिक्षा करेल याबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली.
ना.रामदास आठवले २ ऑक्टोबर ला हाथरस जाणार होते मात्र तेथील जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या नेत्यांना प्रवेशबंदी केली होती. प्रशासनाच्या विनंती मुळे ना रामदास आठवले यांनी आपला दौरा बदलून लखनौ ला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल  आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली होती. त्यानंतर   रामदास आठवले आज मुंबईत परतल्यानंतर उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  रामदास आठवलेंना दूरध्वनी करून हाथरस प्रकरणी चर्चा केली. हाथरस प्रकरणात पीडित बळीत दलित युवतीच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देऊन तिला  न्याय मिळवून देऊ ; तिच्या कुटुंबियांना शहरात चांगले घर देणार; कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देणार ; २५ लाख रुपये सांत्वनपर निधी देणार तसेच या प्रकारणाची सीबीआय द्वारे चौकशी करणार त्याचप्रमाणे या प्रकरणात कारवाईत कर्तव्यात कसूर करणारे जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधिकारी निलंबित केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली आहे. दरम्यान हाथरस प्रकरणातील मृत्युमुखी पडलेल्या  दलित युवतीच्या कुटुंबियांची हाथरस येथे जाऊन   उद्या मंगळवारी  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले भेट घेणार आहेत. हाथरसप्रकरणातील दलित मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळवून देण्याची सूचना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करणार आहेत.

 409 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.