शासकीय सेवेतही सामाजीक दृष्टिकोन जोपासणारे व्यक्तिमत्त्व-डॉ.तरुलता धानके

किन्हवली सारख्या आदिवासी ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ.धानके यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन डॉ.आनंदीबाई जोशी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन २००७ या वर्षी पुणे येथे सन्मानित केले आहे.

शहापूर (शामकांत पतंगराव ) : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी ते तालुका वैद्यकीय अधिकारी अशी शासकीय सेवेतील भरारी घेऊनही पाय सतत जमिनीवर असावेत व ते नेहमी सत्कर्मासाठी धावावेत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शहापूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तरुलता धानके या होत.
सुमारे तीस वर्षांपुर्वी किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेल्या डॉ.तरुलता धानके यांनी या परिसरातील लोकांमध्ये सरकारी डॉक्टरांविषयी असलेला नकारात्मक दृष्टीकोन बदलवला.कोकणातील सावंतवाडी येथे जन्मलेल्या डॉक्टर तरुलता परब या विवाहानंतर किन्हवलीच्या रहिवासी झाल्या.दवाखान्याच्या सरकारी इमारतीतच निवासी असल्याने त्यांना या परीसरात अखंडरुग्ण सेवा करता आली.
शासनाने दिलेले अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविताना त्यांनी समाजसेवेला कधीच अंतर दिले नाही.
अनेक बेरोजगार तरुणांना काम धंद्यासाठी वेळोवेळी अर्थसहाय्य केले पण त्याची काहींनी जाण ठेवली तर काहींना विसर पडला याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शासनाचा कोणताही उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात हातखंडा असलेल्या डॉ.तरुलता धानके या जिल्ह्यात कौतुकास पात्र आहेत.
उत्कृष्ट निवेदक व सूत्रसंचालक म्हणून महाराष्ट्राला परिचीत असलेल्या डॉ.तरुलता धानके यांचा मराठी भाषेवर प्रभुत्व आहे.
किन्हवली सारख्या आदिवासी ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ.धानके यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन डॉ.आनंदीबाई जोशी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन २००७ या वर्षी पुणे येथे सन्मानित केले आहे.
मासिकपाळी व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत दिलेल्या यशस्वी योगदानाबद्दल यशवंत पंचायतराज अभियानाच्या वतीने सन २०१७ या वर्षी त्याना तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे,दादा भुसे,ग्रामविकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते “गुणवंत अधिकारी”पुरस्काराने गौरविले.महाराष्ट्रात प्रथमच एका वैद्यकीय अधिकाऱ्याला गौरविण्याचे हे उदाहरण आहे.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अतिसंवेदनशील व अचर्चित विषय असलेल्या मासिक पाळी व्यवस्थापन कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रिन सिटी या संस्थेने ब्लू रुफ क्लबमध्ये vocational Excellence award of Women achiver या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
डॉ.तरुलता धानके यांनी अनेक राष्ट्रीय परिसंवादात सहभाग घेतला असून महिला व बालकल्याण ,व्यसन,आरोग्य या विषयांवर सतत मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत.मधुमेही रुग्णांसाठी नेत्र तपासणी, कुष्ठरोग शोध निर्मूलन, कुपोषण, स्वच्छ भारत, महिला सक्षमीकरण, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब आरोग्य मेळावा,किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निवारण,सॅनिटरी नॅपकिन वाटप अशा कार्यक्रमांत प्रबोधन केले आहे.
शहापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व अनेक कोरोना संशयीतांना आपले  swab देण्यासाठी शहापुरला जावे लागू नये तसेच गरजूंना वेळेत निदान व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके मॅडम या माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा शासनाच्या बहुउद्देशीय कार्यक्रम
शहापूर तालुक्यात नियोजनबद्ध राबवित आहेत.
महाराष्ट्र शासनाने सध्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” हा बहुउद्देशीय कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली असून त्यास शहापुर तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर्स हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून अपार मेहनत घेत आहेत. कोरोना संवेदनशील भागात खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी मोफत कोव्हिड तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत.
शासकीय सेवेत उत्तम कामगिरी करून नावलौकिक मिळविलेल्या डॉ.तरुलता धानके या सामाजिक कार्यातही अग्रभागी असतात. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवरच असावेत, सत्कर्माला धावण्यासाठी असे मानणाऱ्या
अशा या सेवावर्ती व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस असून त्यांना हार्दिक शुभेच्छा!

 401 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.