ठाण्यात काँग्रेसचा जिल्हा मुख्यालयासमोर सत्याग्रह

.   

उत्तरप्रदेशमधिल हाथरस येथील घटनेचा केला निषेध

ठाणे : ठाणे काँग्रेसच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस मुख्यालयासमोर हाथरस येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सत्याग्रह करण्यात आला.
उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील दलित समाजातील १९ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे अनन्वित हाल करण्यात आले,१९ वर्षाच्या या पिडीतेला जिवंत असतानाही यातना देण्यात आल्या आणि मृत्यूनंतरही तीची अवहेलना करण्यात आली त्या पिडीतेवर अत्यंसंस्कार करण्याचा हक्कही निर्दयी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीच्या कुटुंबियांना दिला नाही.  उत्तर प्रदेशातील भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारने अत्यंत निर्लज्जपणाचा कळस केला आहे.या पिडित मुलीच्या कुठुबियांच्या भेटायला गेलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना जाण्यास मज्जाव करून त्याना धक्का बुक्की करणे व प्रसार माध्यमांना ही भेटू न दिल्याने संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने  आज ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील काँग्रेस मुख्यालया जवळ सत्याग्रह करण्यात आला.
         याच पार्श्वभूमीवर आज ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांनी ठाणे काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शहराध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला,कार्यकर्त्यानी हाताला काळे पट्ट्या  बाधून या सत्याग्रहात सहभागी होउन मूक निदर्शने केले या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे,माजी गटनेते संजय घाडीगावकर,शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,काँग्रेस नेते रविंद्र आग्रे,सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने प्रदेश काँग्रेस सदस्य. शहर काँग्रेस पदाधिकारी व सर्व विभाग अध्यक्ष, ब्लाॅक अध्यक्ष सहभागी झाले होते.

 323 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.