पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेल्या लोकोपयोगी कार्याची माहिती नागरिकांना दिली.
शहापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे सेवा संपर्क अभियान राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज सकाळी सोगाव जिल्हा परिषद गटातील शिरवंजे गावातून करण्यात आला.
भाजपचे ठाणे जिल्हा सरचिटणीस व भाजपचे पंचायत समितीचे गटनेते,माजी उपसभापती सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली हे सेवा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे
शिरवंजे ग्रामपंचायती मधील शिरवंजे,रायकरपाडा नंबर १,वाचकोले, रायकरपाडा नंबर २ या चार गावापासून सेवा संपर्क अभियानाला सुरवात झाली आहे. सुभाष हरड यांनी शेतकरी,महिला, अपंग लोकांना भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेल्या लोकोपयोगी कार्याची माहिती दिली.
या अभियानात सुभाष हरड यांच्या सोबत शिरवंजे सरपंच यशवंत फर्डे, उपसरपंच प्रकाश भेरे,अनिल भेरे, हरेश हरड,माजी सरपंच एकनाथ माळी, यशवंत म्हस्कर,रुपेश फर्डे यांनी सहभाग घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले चांगले निर्णय, गरीब जनतेसाठी दिलेल्या योजना यांची माहिती यावेळी लोकांना दिली.सेवा संपर्क अभियान सोगाव जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जाणार असून शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून योजनांची माहिती देणार असल्याचे सुभाष हरड यांनी सांगितले
527 total views, 1 views today