प्रा. पुष्पा भावे यांचे दीर्घ आजराने निधन

पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाताई यांनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले.

मुंबई : प्रभावी वक्त्या,परखड समीक्षक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. प्रा. पुष्पाताई भावे मागील काही दिवसांपासुन खूप आजारी होत्या.
विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाताई यांनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले.
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला. तसेच त्या उत्तम लेखिका सुद्धा होत्या डॉ. श्रीराम लागू यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुष्पाबाईंच्या संपादनाखाली निघालेला ‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू’ हा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो.

 307 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.