कृषी विधयेकाच्या विरोधात शहापूर काँग्रेसचे जोरदार धरणे आंदोलन
शहापूर : केंद्र सरकारने पारित केलेली कृषी विधेयक ही शेतकरी विरोधी असून भांडवलशाही भाजप करणारने ही विधेयक मागे घ्यावीत यासाठी शहापूर तालुका काँग्रेस पार्टीने तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली शहापूर मध्ये जोरदार धरणे आंदोलन केले
राष्ट्रपिता महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली,यावेळी तालुका अध्यक्ष महेश धानके,जेष्ठ नेते ऍड नारायण वेखंडे, अपर्णताई खाडे, जितेश विशे,रवींद्र परटोळे, यांनी आपल्या मनोगतातुन मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणावर सडकून टीका केली,यावेळी हे विधयेक मागे घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निवेदनावर सह्या करण्याचा शुभारंभ करण्यात आला,शहापूर तालुक्यातील प्रत्येक गावात सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी जाहीर केले,युवक काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजयदादा पाटील यांनीही या धरणे आंदोलनास भेट दिली,
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण घरत,आबा देशमुख,पद्माकर केव्हारी,गजानन बसवंत,सुरेंद्र साळवी,असिफ शेख,,महिला तालुका अध्यक्ष संध्या पाटेकर,राजेश बुंदेले,लक्ष्मण निचिते,विश्वास गोरे,शैलेश राऊत,शांताराम धामणे,महेंद्र आरज,जयकुमार करण,जयंत पाटील,निलेश भोईर,संतोष ठाकरे,रामचंद्र जोशी यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी कोथले येथील ग्रामपंचायत सदस्य झिपा वीर ,ढाढरे ग्रामपंचायत सदस्य किशोर रिकामा यांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला
436 total views, 2 views today