जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम ३० औषधाचे वाटप

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत उशीद,  पळसोली, फळेगाव, रूंदे, आदी गावांतील नागरिकांना  औषधांचे वाटप करण्यात आले.

ठाणे : जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाच्या ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. आज  जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत उशीद,  पळसोली, फळेगाव, रूंदे, आदी गावांतील नागरिकांना अर्सेनिक अल्बम ३० या औषधांचे वाटप करण्यात आले. दरम्यान काही गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कल्याण पंचायत समिती उपसभापती  रमेश बांगर, गट विकास अधिकारी श्वेता पालवे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप मासाल, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी मंडळी उपस्थितीत होते.
कोव्हिडं साथरोगाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासना मार्फत प्रतिबंधित उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सूचित केलेल्या अर्सेनिक अल्बम ३० औषध प्रत्येक गावात वाटण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने केले आहे. सध्या राज्य शासनाची महत्वाकांक्षी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अर्सेनिक अल्बम ३० हे औषध गावोगावी वाटप केले जात आहे. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीचा सहभाग मिळत आहे.

 386 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.