ठाणे महापलिकेचे प्लाझ्मा केंद्र लवकरात लवकर सुरू करा

वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य विक्रांत तावडे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील जिल्ह्यामधील  कोरोनाचा  चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे पालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या सर्व टीम काम करीत आहे. दुसरीकडे मृत्यूचा दर रोखण्यासाठी देखील विविध उपाय योजना पालिकेच्या स्तरावर सुरू आहेत. कोरोनावर  वर प्रभावी लस बाजारात उपलब्ध न झाल्याने त्यावरील वैद्यकीय उपचारांना मर्यादा देत असून काही प्रतिबंधात्मक इंजेक्शनचा वापर करून त्याचा मुकाबला करण्यात येत आहे . मात्र ठाणे जिल्ह्याचे स्वतःचे प्लाजमा केंद्र ठाण्यात तातडीने सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून गरीब गरजू रुग्णांना विनाशुल्क व आर्थिक दृष्ट्या सक्षम रुग्णांना वाजवी शुल्क भरून प्लाझ्मा उपलब्ध होऊ शकेल.
या सर्व बाबी लक्षात घेता ठाणे जिल्हा व ठाणे महानगरपालिकेने स्वतःचे प्लाजमा सेंटर प्लाझ्मा केंद्र ठाण्यात तातडीने सुरू करावे असे सामाजिक कार्यकर्ते व वृक्ष प्राधिकरण ठाणे महानगरपालिका सदस्य विक्रांत तावडे यांनी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून निवेदन दिले आहे. तर या बाबत पालिका आयुक्त यांनी सकारत्मक भूमिका घेऊन या बाबत लवकरात लवकर प्लाझ्मा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे  विक्रांत तावडे यांनी सांगितले आहे.
कोरोना बाधीत रुग्णांनी पुढे येऊन सकारात्मकपणे प्लाझ्मा दान करीत आहेत. ठाण्यात कुठे प्लाझ्मा दान सेंटर नसून मुंबई येथे प्लाझ्मा केंद्रे आहेत. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात देखील लवकरत लवकर असे सेंटर सुरू करावीत अशी मागणी विक्रांत तावडे यांनी केल्यानंतर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी देखील मनावर घेतले असून ठाणे महापालिका येत्या १५ दिवसांत ठाण्यात प्लाझ्मा केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन शर्मा यांनी दिले.

 319 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.