जयंती वेलजी गडा रिपाइंच्या मुंबई प्रदेश गुजराती आघाडीच्या अध्यक्षपदी

रिपब्लिक  पक्षात गुजराती भाषिक आघाडीची स्थापना – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई :  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचा ६३ वा वर्धापन दिन ३ऑक्टोबर ला देशभर साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज रिपब्लिकन पक्षात गुजराती भाषिक आघाडी ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली. त्यानुसार आज रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश गुजराती भाषिक आघाडीच्या  अध्यक्ष पदी अंधेरीतील समाजसेवक आणि मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष जयंती वेलजी गडा यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परोषदेत केली. यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री अविनाश महातेकर ;राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर ; एम एस नंदा  तसेच गुजराती भाषिक आघाडी चे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष  जयंती वेलजी गडा उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश गुजराती आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झालेले जयंती वेलजी गडा हे मुंबई च्या अंधेरी विभागात  समाजसेवक आहेत.मुंबईतील गुजराती भाषिकांना संघटित करणारे;गुजराती व्यापारी संघटनांमध्ये कार्यरत असणारे  जयंतीभाई गडा हे गरीब गरजूंना औषधं ; रेशन ची मदत करीत असतात. केंद्रियराज्यमंत्री रामदास  आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष सर्व समाजाच्या सर्व भाषिक सर्व प्रांतीय लोकांना सोबत घेणारे असणारे त्यांच्या नेतृत्वावर  विश्वास ठेवून जयंती गडा यांनी रिपाइं मध्ये जाहीर प्रवेश केला .

 326 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.