डॉ. रुपाली सातपुते ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी

डॉ.  सातपुते यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेत ग्रामविकास आणि लोकहिताबरोबरच महिला सक्षमीकरणावर मोठा भर दिला आहे. त्यांनी महिलांना विविध व्यवसायासाठी प्रोत्साहन तर दिलेच, याशिवाय विविध कौतुकास्पद उपक्रमही राबविले.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ. रुपाली सातपुते यांची नियुक्ती झाली आहे. या अगोदर त्या प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे येथे कार्यरत होत्या. त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असून  ग्रामविकासाबरोबरच लोकहिताच्या विविध योजना राबविण्यामध्ये आघाडी घेताना नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे लोकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. विटा, चिपळूण, दहिवडी, पन्हाळा, उस्मानाबाद आणि ठाणे या जिल्हांमध्ये निर्मलग्राम, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गावे, कुपोषण निर्मुलन तसेच वंचित घटकांना घरकुले मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलेल्या आहेत. 
२०१७ पासून त्या ठाणे जिल्हा परिषदमध्ये प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असतांना  घरकुलाचा लक्षवेधी कार्यक्रम त्यांना राबविला. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आवास योजनांतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुलाचे काम सर्वोत्तम केले. त्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. डॉ.  सातपुते यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेत ग्रामविकास आणि लोकहिताबरोबरच महिला सक्षमीकरणावर मोठा भर दिला आहे. त्यांनी महिलांना विविध व्यवसायासाठी प्रोत्साहन तर दिलेच, याशिवाय विविध कौतुकास्पद उपक्रमही राबविले. महिलांच्या हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात नाही. मात्र, उस्मानाबादमध्ये असतांना त्यांनी या प्रथेला फाटा देण्याचे काम केले. विधवा महिलांच्या जगण्यातील लढ्याचा संदर्भ देत त्यांनी अशा उपक्रम विधवा महिलांना पहिले वाव देण्याची संकल्पना सुरु केली.  महिलांना कौटुंबिक पातळीवर पती, मुले यांच्या व्यसनाधीनतेचा मोठा त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच त्यांनी व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न केले.  उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्येही त्यांचा मोठा सहभाग होता. किमान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याशिवाय लग्न करणार नाही, अशी शपथ मुलींना देण्यात स्त्युत्य उपक्रमही त्यांनी राबविला.  मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले.

 367 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.