पंतपधानांच्या वाढदिवसानिमित भाजप कार्यकर्त्याची सामाजिक बांधिलकी
ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.याचे औचित्य साधून ओबीसी समाज बांधवांसाठी कार्यरत असलेले ठाण्यातील भाजप कार्यकर्ता कृष्णा भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.भुजबळ यांनी पदरमोड करून ७० नाभिकांना पीपीई किटचे वाटप करून एकप्रकारे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण उपक्रम राबवला.याच धर्तीवर संपूर्ण ठाण्यातील नाभिकांनादेखील पीपीई किट पुरवण्यात येणार असल्याचे भाजपा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. याप्रसंगी,ठाण्याचे आमदार संजय केळकर,प्रदेश सचिव संदीप लेले,नगरसेवक भरत चव्हाण, उपाध्यक्ष राजेश गाडे,संतसेना पुरोगामी नाभिक संघटनेचे अध्यक्ष सचिन कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ह्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून सहाव्या दिवसाची सुरुवात कोपरी प्रभागात करण्यात आला.गेले आठवडाभर ठाण्यात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन व पथविक्रेत्यांसाठी आत्मनिर्भर पथविक्रेता योजना शिबीराच्या माध्यमातुन गोरगरीबांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.या पाश्र्वभूमीवर कोपरीतील भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते कृष्णा भुजबळ यांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या नाभिक समाजाला मदतीचा हात दिला आहे.भुजबळ यांनी ७० नाभिकांना मोफत पीपीई किट पुरवुन एकप्रकारे नाभिक बांधवांसह केश कर्तनालयात जाणाऱ्या ग्राहकांच्याही आरोग्याची चिंता वाहिली आहे.तथापी,कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण ठाणे शहरातील सुमारे अडिच हजार नाभिक कारागिरांना पीपीई किटचे संरक्षण पुरवण्याचा मनोदय आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी व्यक्त केला.तर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातुन देशातील बारा बलुतेदारांसाठी साह्यकारी उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोपरी मंडळ अध्यक्ष सिद्धेश पिंगुळकर,शैलेश मिश्रा, शेखर निकम,साहिल कदम,गणेश खामकर आणि राजेंद्र सावंत आदीनी परिश्रम घेतले.
521 total views, 2 views today