किन्हवलीत शासकीय दाखले शिबिराचे उद्घाटन

आदिवासी समाज विकास सेवा संस्थेच्या गाव विकास केंद्र अंतर्गत राबविण्यात आला उपक्रम

शहापुर (शामकांत पतंगराव) : शहापुर तालुक्यातील किन्हवली येथे काल आदिवासी,बिगर आदिवासी समाज हितार्थ कार्य करणाऱ्या आदिवासी समाज विकास सेवा संस्थेच्या गाव विकास केंद्र अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय दाखल्यांच्या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या अनेक महिला केंद्र संचालक व महिला संघ आणि सहकारी यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
शहापुर तालुक्यातील किन्हवली येथे आदिवासी,बिगर आदिवासी समाज हितार्थ कार्य करणाऱ्या आदिवासी समाज विकास सेवा संस्थेच्या गाव विकास केंद्र अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय दाखल्यांच्या शिबिराचे उद्घाटन शहापुर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य तथा भाजपाचे गटनेते सुभाष हरड यांच्या हस्ते करण्यात आले.
शहापूर तालुक्यातील किन्हवली सारख्या आदिवासी दुर्गम भागात गेली दोन वर्षांपासून सामाजिक कार्य करणाऱ्या
आदिवासी समाज विकास सेवा संस्थेने आपल्या कार्यपद्धतीने गावोगावी मोठे जाळे विणले आहे.इथल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी,धान्य बँकेच्या माध्यमातून शेतकरी संस्था दत्तक,अनुदानित आर्थिक भांडवल, बेरोजगारांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण, व्यवसायानंतर अनुदानित कर्ज, गाव पातळीवर लघुउद्योग, मुलगी असेल तर तिच्या वयाच्या १८ वर्षांनंतर लग्न किंवा पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून सुकन्या समृद्धी योजना,कन्यादान योजना,महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मदतीने वर्षभर रोजगार उपलब्ध अशा अनेक योजना राबविल्या आहेत व अजूनही या योजना खेडयापाड्या पर्यंत राबविण्याचा उद्देश आहे.
काल ( दि.२०) या संस्थेच्या शासकीय दाखले शिबिराचे उद्घाटन )शहापुर पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य तथा भाजपाचे गटनेते सुभाष हरड, पत्रकार शामकांत पतंगराव,पंचायत समिती सदस्य काशिनाथ वाख आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राम पातळीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अनेक महिला केंद्र संचालक व महिला संघ आणि सहकारी यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक तथा राज्य व्यवस्थापक नयन जाधव,प्रकल्प व्यवस्थापक संदीप नाटकरे, सहाय्यक व्यवस्थापक विठ्ठल सुर्यवंशी, मुख्य प्रवक्ते कुमार शिरावले,स्थानिय समिती अध्यक्ष निखिल मोंडुळा,
आत्मनिर्भर शाखेच्या अखिल भारतीय महिला गृहउद्योग अध्यक्ष शारदा धसाडे,अखिल भारतीय स्वयं सहाय्यता संघाचे अध्यक्ष गुरुनाथ उघडा, राजेश घागस,गणेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुभाष हरड यांनी उपस्थित महिलांना रोजगाराविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गगे यांनी तर आभार रविंद्र हरड यांनी मानले.

 488 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.