कल्याणामध्ये सेना भाजपला खिंडार

युवा कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

कल्याण : कल्याणमध्ये शिवसेना भाजपाला खिंडार पडली असून युवा सेना आणि भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यात सुरू असलेल्या शिवसेना भाजपच्या सत्ता संघर्षाला कंटाळलेल्या युवा नेतृत्वाने पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला पंसती दिली आहे. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे विभाग अधिकारी पियुष चौधरी व भाजप विद्यार्थी आघडीचे पदाधिकरी सदानंद टावरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मनविसेत प्रवेश करत मनसेचा झेंडा हाती घेतला.
शिवसेना भाजपच्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतल्याने कल्याण डोंबिवली मनसेत नवचैतन्य निर्माण झाले असून सेना भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

 396 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.