भारतामध्ये अल्झायमर आजाराबाबत आजही जागरूकतेचा अभाव!

   

वृद्ध व्यक्ती हरविण्यात अल्झायमरचा मोठा वाटा

(आज २१ सप्टेंबर, जागतिक अल्झायमर जागरुकता दिन. त्यानिमित्त घेतलेला हा आढावा)


मुंबई :  संपूर्ण जगभरामध्ये २१ सप्टेंबर हा दिन  जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते व स्वत:कडे लक्ष देण्यासाठी असमर्थ होतो. १९०६ मध्ये अ‍ॅलॉइस अल्झायमर या जर्मन डॉक्टराने यांनी हा रोग शोधून काढला. चोर पावलांनी येणारा हा स्मृतिभ्रंश वाढत्या वयानुसार वाढत जातो. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. सुरवातीला स्वतःचे नाव विसरणे नंतर घरातील माणसांची नवे विसरणे अथवा ओळख विसरणे,जेवण व इतर रोजची काम विसरणे अशी लक्षणे दिसून येतात. अनेक वेळा घरातील मंडळी वयोमानानुसार ही लक्षणे आढळतात म्हणून दुर्लक्ष करतात परंतु हळूहळू ही लक्षणे वाढतात व नंतर घरातील मंडळी डॉक्टरकडे धाव घेतात. याविषयी अधिक माहिती देताना बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे न्यूरोलॉजीतज्ञ डॉ. सिद्धार्थ वॉरिअर सांगतात, ” भारतामध्ये या आजाराची सुरुवात तिशी ते साठी दरम्यान होऊ शकते, जशी लक्षणे वाढतात तशी मेंदूला जास्त प्रमाणात हानी होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार जगभरात अल्झायमर व त्या संबंधीत आजार असलेल्या नागरिकांची संख्या ५० दशलक्ष असून दार वीस वर्षांनी ती दुप्पट होते. या आजारात मृत्यूचे प्रमाण कमी अथवा लगेच नसल्यामुळे अनेकजण मुख्यतः रुग्णांचे नातेवाईक याकडे दुर्लक्ष करतात. या आजाराची  आपण “वाढत्या वयामुळे स्मृतीभंश झाला आहे ” अशी गोंडस व्याख्या तयार करून ठेवली आहे म्हणुनच आपल्याकडे या आजाराचे रुग्ण घरातून निघून जाणे म्हणजेच वृद्ध नागरिक हरविण्याचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वयात अल्झायमर होण्याचे प्रमाण जास्त आहे कारण वयानुसार मेंदूतील काही भाग आकुंचित होणे, सुजणे तसेच फ्री रॅडिकलचे उत्पादन (प्रथिने वाढणे) होणे व शेवटी अल्झायमर पूर्ण मेंदूत पसरणे अशे ही प्रक्रिया असते परंतु जर रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्यावर उपचार केले तर त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. वयाच्या चाळीशी अथवा पन्नाशीमध्ये मध्ये होणारा हा आजार मुख्यतः अनुवांशिक व दुर्मिळ असतो, त्यामुळे कुटुंबात जर हा आजार असेल तर त्या कुटुंबाने विशेष काळजी घेतली पाहिजे,परंतु वाढत्या वयात होणारा हा आजार सर्वसामान्य आहे, वाढते वय, जीवनशैली, पर्यावरणातील बदलांमुळे अनेक वयोवृद्ध नागरिक या आजाराने त्रस्त आहेत. वाढत्या वयात आक्रमकता, व्याकुळता, अस्वस्थता व नैराश्य यावर नियंत्रण असणे फार गरजेचे आहे व त्यासाठी या वृद्ध व्यक्तींच्या घरातील माणसांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, यांसोबत आहार नियंत्रण, चरबीयुक्त पदार्थांचे  सेवन कमी करणे, नियमित व्यायाम करणे, संगीत ऐकणे या सवयी सुद्धा हा आजार टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.”
२०५० सालापर्यंत प्रत्येक ८० नागरिकांमागे १ असे प्रमाण होण्याचा धोका वैद्यकीय विश्वातून दिला आहे. डिमेन्शिया गटातील कोणत्याही व्याधींमध्ये मेंदूच्या कार्यात बाधा येते व अल्झायमर हा प्रमुख आजार बनून राहतो. माणसाची स्मरणशक्तीच काय परंतु विचारशक्ती देखील पालटण्याची क्षमता या विकारात असल्यामुळे हा आजार आता गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे कारण या आजाराची सुरुवात मेंदूमध्ये  झाल्यानंतर साधारण दहा वर्षे उलटल्यावर याची ठळक लक्षणे आढळून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत दयनीय लक्षण असू शकते. अशा अवस्थेमधील रुग्णाची काळजी  करणे किती कठीण असेल याची कल्पनाही करवत नाही ! एकदा हा आजार जडल्यावर निश्चितपणे संथ गतीने सतत वाढतच जाणारी ही व्याधी आहे व त्यासाठी वेळ न दवडता तात्काळ उपचार घेणे फायद्याचे ठरेल, अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे न्यूरोलॉजी तज्ञ डॉ सिद्धार्थ वॉरिअर यांनी दिली.

 480 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.