भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे : भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे.
इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शिंदे यांनी तिथेही भेट देऊन जखमींची विचारपूस केली, तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.
या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असे शिंदे यांनी जाहीर केले. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले.
आतापर्यंत सुखरूप सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे
१) हेदर सलमानी( पु/२०वर्ष)
२) रुकसार खुरेशी(स्त्री/२६ वर्ष)
३) मोहम्मद अली(पु/६० वर्ष)
४) शबीर खुरेशी(पु/३० वर्ष)
५) मोमीन शमीऊहा शेख (स्त्री/४५ वर्ष)
६) कैसर सिराज शेख (स्त्री/२७ वर्ष)
७) रुकसार जुबेर शेख ( स्त्री/ २५वर्ष)
८) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु/१८ वर्ष)
९) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु/२२ वर्ष)
१०) जुलेखा अली शेख (स्त्री/५२ वर्ष)
११) उमेद जुबेर कुरेशी (पु/४वर्ष)
१२) आमीर मुबिन शेख (पु/१८ वर्ष)
१३) आलम अन्सारी (पु/१६ वर्ष)
मृत व्यक्तीची नावे पुढीलप्रमाणे
१) झुबेर खुरेशी(पु/३० वर्ष)
२)फायजा खुरेशी(पु/५वर्ष)
३)आयशा खुरेशी(स्री/७वर्ष)
४)बब्बू(पु/२७वर्ष)
५) फातमा जुबेर बबु (स्त्री/२वर्ष)
६) फातमा जुबेर कुरेशी (स्त्री/८वर्ष)
७) उजेब जुबेर (पु/६ वर्ष)
८) असका आबिद अन्सारी (पु/१४ वर्ष)
९) अन्सारी दानिश अलिद (पु/१२ वर्ष)
१०) सिराज अहमद शेख (पु/२८ वर्ष)

 462 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.