पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार गणपतशेठ गायकवाड, भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडळ व शिक्षक आघाडी यांच्या वतीने राबवण्यात आला उपक्रम
कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार गणपतशेठ गायकवाड, भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्व मंडळ व शिक्षक आघाडी यांच्या वतीने टिटवाळा येतील जनसंवर्धन गुरुकुल व पारस बाल भवन या दोन अनाथाश्रमातील मुलांना शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप कल्याण पूर्व भाजपाध्यक्ष संजय मोरे, महिला अध्यक्षा प्रिया जाधव, उपाध्यक्ष निशा सिंग सरचिटणीस प्रितेश म्हात्रे शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष सुधाकर ठोके, शिक्षक आघाडीच्या चिटणीस लीपिका पाल व भाजपाचे पदाधिकारी अविनाश शिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी आश्रमाच्या संचालिका संगिता गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले. ज्या वस्तूचे वाटप करण्यात आले त्यामध्ये तांदूळ, साखर, बिस्किटे, कॅडबरी चॉकलेट या जीवनावश्यक वस्तू तर शालेय साहित्यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, रबर शॉपनर, बुक कवर, ब्लॅक बोर्ड, स्केल व एक्झाम पॅड याचा समावेश होता.
सदर कार्यक्रमास संजय मोरे, आदित्य सिंग, उदय गायकवाड, सुप्रिया नायकर, सुधाकर ठोके, बद्रीनारायण मिश्रा व अविनाश ओंबासे यांनी वस्तू व साहित्य साठी सहकार्य केले.
641 total views, 3 views today