पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते टीडीआरएफ व अग्निशमनदलातील जवानांचे कौतुक
ठाणे : महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रसंगी ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ आणि अग्नीशमन दलाची दोन पथके तातडीने घटनास्थळी दाखल होवून तेथील मदतकार्य वेगाने सुरू केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकतेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल व आपत्ती प्रतिसाद दलातील जवानांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
२४ ऑगस्ट रोजी महाड येथील काजळपूर येथे इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुघटनेमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल व टीडीआरएफची दोन पथके घटनास्थळी रवाना होवून मदतकार्यास सुरूवात केली. एनडीआरएफच्या टीमसोबत टीडीआरएफ व ठाणे महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या सहकार्याने मदतकार्य वेगाने सुरू करुन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. त्यांच्या या योगदानाबद्दल ठाणे महापालिकेस प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. हा सत्कार ठाणे अग्निशमन विभागातील उपस्थानक अधिकारी ओंकार वैती व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील सचिन दुबे यांनी स्विकारला.
619 total views, 1 views today