नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त कल्याण मध्ये स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण

भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांचे आयोजन

कल्याण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कल्याण पश्चिमेत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजूंना मदत करणे आदी विविध उपक्रमांचा समावेश असून  त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेतील गजानन महाराज मंदिराजवळ, बेतूरकर पाडा, येथे वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी भटके विमुक्त आघाडीचे महराष्ट्रातील पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. सामाजिक कामं करून पंतप्रधानांना अनोख्या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी दिल्या असल्याची माहिती यावेळी माजी आमदार आणि भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी दिली.
दरम्यान यावेळी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्र्विद्यालयच्या अलका दीदी, प्रदेश सरचिटणीस संतोष आव्हाड, गजानन महाराज मंदिर विश्वस्त गणेश खैरनार, ओबीसी आघाडी प्रदेश सचिव अनिल पंडित, अशोक वणवे, निहारिका खोंदले, यशवंत वैदू, अशोक शेळके, गोविंदा गुंजाळकर, अजय कदम, कल्पेश जोशी, रितेश फडके, निखील चव्हाण, प्रताप ठुमकर, रोहित लांबतुरे, जनार्धन कारभारी, गौतम दिवाडकर, सुनील शेट्टी,  प्रकाश पाटील,रोहित जाधव, उमेश पिसाळ, सुनील शेट्टी, किशोर खैरनार, विजय शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.  

 486 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.