महाराष्ट्राचा ब्रँड कोण?

महाराष्ट्राचा  जर ब्रँड कोण असेल तर ते संत ज्ञानेश्वर महाराज ; महात्मा ज्योतिबा फुले आहेत. सावित्रीबाई फुले आहेत .छत्रपती शिवाजी महाराज;  छत्रपती संभाजी महाराज;  छत्रपती राजश्री शाहू महाराज; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. शिवाजी महाराज ;फुले शाहू आंबेडकर ही जगात महाराष्ट्राची ओळख आहे. या महापुरुषांची कोणत्याही आजच्या ब्रँडशी तुलना होऊ शकत नाही.

              (हेमंत रणपिसे)

महाराष्ट्राचा ब्रँड कोण हा विषय लिहिण्यास कारण असे आहे की  शिवसेनेचे प्रवक्ते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी नुकतेच असे म्हटले आहे कि  महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे हाच आहे.  मुंबईचा आणि महाराष्ट्राचा ब्रँड हा केवळ ठाकरे हाच आहे.त्या ठाकरे मध्ये उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे यांचा ही समावेश आहे. असे सांगत   राज ठाकरे यांना केविलवाणी साद घालून कंगना विरुद्ध च्या लढ्यात  राज ठाकरेंचीही मदत घेण्याचा  प्रयत्न केला. संजय राऊत यांच्या या  केविलवाण्या विनवणीला  तात्काळ मनसे ने फेटाळून लावले. मराठी माणसासाठी अभिमन्यू प्रमाणे राज ठाकरे एकटे लढत होते तेव्हा  शिवसेनेना कुठे होती? परप्रांतीयांविरुद्ध मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे लढत होते तेंव्हा शिवसेनेने राज ठाकरेंना कुठे पाठिंबा दिला तेंव्हा राज ठाकरे हे ठाकरे ब्रँड आहेत हे का नाही शिवसेनेला  आठवले असे प्रतिउत्तर मनसेने शिवसेने ला दिले.
संजय राऊत  यांनी दावा केला की मुंबई आणि महाराष्ट्राचा एक नंबरचा ब्रँड ठाकरे  आहे आणि त्यानंतर शरद पवार पवार ब्रँड आहेत आणि त्यानंतर इतर ब्रॅंड आहेत.  संजय राऊत यांनी स्वयंघोषित केलेला महाराष्ट्राचा  एक नंबर ब्रँड  शिवसेना आणि दोन नंबर ब्रँड  शरद पवार हा दावा मनसेने दिलेल्या उत्तराने  फोल ठरलेला आहे.  पवार हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत नक्कीच आहेत जर ठाकरे आणि पवार यांना महाराष्ट्राचे ब्रँड  गृहीत धरलं तर  या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी जनतेचा फार मोठा फॅक्टर आहे. आंबेडकरी जनतेचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे करीत आहेत.आठवले हे महाराष्ट्राचा जबरदस्त  ब्रँड आहे. आठवले हा ब्रँड  आंबेडकरी जनतेचा निळ्या झेंड्याचा गोरगरिबांना न्याय देणाऱ्या नेत्याचा ब्रँड  आहे .या ब्रॅण्डचा उल्लेख न  करता केवळ आपलीच पाठ थोपटून घ्यायचं काम संजय राऊत यांनी  ठाकरे आणि पवार यांचा महाराष्ट्राचे ब्रँड म्हणून उल्लेख करून केलं.  ब्रँड ची जी भाषा करतात त्या  महाराष्ट्राचा; शिवसेनेचा खरा ब्रँड  कोणी असेल तर वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते.
त्यांनी आठवले ब्रॅंडला ओळखलं. २५ जानेवारी २०११ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी  रामदास आठवले यांचा आठवले ब्रँड ओळखून त्यांच्याशी हातमिळवणी करीत शिवशक्ती-भीमशक्ती उभी केली.  एक वादळ उभं केलं आणि त्या वादळामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस  आणि  काँग्रेस  हे सगळे पालापाचोळयासरखे उडून गेले.  शिवसेना-भाजप-आरपीआय शिवशक्ती भिमशक्ती महायुतीचे वादळ राज्यात घोंघावले. त्यात आठवले ठाकरे आणि मुंडे ( ए टी एम ) हे ब्रँड होते.
राजकारणामध्ये कालचा दुश्मन आजचा दोस्त आणि आजचा दुश्मन  उद्याचा  दोस्त होत असतो.  राजकारणामध्ये कधी कोणी कायमचा वैरी नाही आणि कधी कुणी कायमचा मित्र नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे  दाखवून दिलेलं आहे. पंचवीस वर्ष भाजपला कमळाबाई म्हणून हिणवले त्याच भाजप  बरोबरच पंचवीस वर्षे त्यांनी संसार केला .शिवसेने चा धनुष्यबाण आता विषारी वाकबाण भाजपवर  सोडतात त्याला उत्तर भाजपचे नेते  देतील.  परंतु रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा  ब्रँड अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला तर ती चूक ठरेल आणि म्हणून आम्हाला हेच सांगायचं ठाकरे आणि पवार यांच्याबरोबर महाराष्ट्र मध्ये जर कोणता ब्रँड असेल तर रामदास आठवले या नावाचा ब्रँड आहे. रामदास आठवले ज्यांच्या बाजूने जातात त्यांना सत्ता मिळते. हे  बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केलं होतं.  शिवशक्ती-भीमशक्ती भाजप महायुती घडविली. सन २००९ च्या विधानसभा निवडणुका त्यानंतर २०१२ची शिवसेनेसाठी महत्त्वाची निवडणूक असणारी मुंबई महापालिकेची निवडणूक आठवा.  शिवसेना उभी आहे त्याचा पाया मुंबई महापालिका निवडणुक आहे.  मुंबई महापालिकेच्या बळावरच शिवसेना राज्यात आणि देशात उभी आहे शिवसेने च्या इमारतीचा पाया मुंबई महापालिका आहे.  शिवसेनेचा तो पायाच २०१२ च्या मनपा निवडणुकीत  धोक्यात आला  होता.  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे प्रचंड यश मिळाले होते. मुंबईत अनेक आमदार निवडून आले आणि त्या मतदानाचा मुंबईत वॉर्ड निहाय निकाल पहिला तर शिवसेनेचा निकाल लागला होता. ती परिस्थिती तशीच राहिली तर २०१२ च्या मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेच पालिकेतील किल्ला ढासळणार होता. मनसेच्या बंडखोरीमुळे मनसे फॅक्टरमुळे  मुंबई महापालिकेचा शिवसेनेचा  किल्ला ढासळणार होता. तो वाचविण्यासाठी २०११ साली शिवसेनेने महाराष्ट्राचा ब्रँड असणाऱ्या रामदास आठवलेंसोबत युती करून  शिवशक्ती भीमशक्ती ची एकजूट उभारली. त्यामुळेच शिवसेने चा मुंबई मनपाचा किल्ला वाचू शकला.नाहीतर आता
चित्र वेगळे असते.
महाराष्ट्राच्या  राजगादीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री  राज्यकारभार करतो आहे.  पण २०११ मध्ये  शिवशक्ती भीमशक्ती एकजूट झाली नसती आज हे चित्र नसतं.  चित्र वेगळं असतं.  उद्धव ठाकरे नाही तर  राज ठाकरे हा ब्रँड दिसला असता .
महाराष्ट्राची वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात अठरापगड जाती आहेत. महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये आदर्श राज्य आहे.  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय सामाजिक परिस्थितीचे देशात कौतुक होते. महाराष्ट्रात सूडबुद्धीने राजकारण होत नाही.एकमेकांचा आदर करणारे राजकारण समंजस भूमिका घेणारे राजकीय वर्तुळ राज्यात आहे. त्याला कारण  राज्यात निर्माण झालेले संत-  महापुरुष आहेत.  त्यांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण शुद्ध केले. महाराष्ट्राचं आदर्श उदाहरण संपूर्ण देशात दिलं जातं कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रही महापुरुषांची भूमी आहे.
महाराष्ट्राचा  जर ब्रँड कोण असेल तर ते संत ज्ञानेश्वर महाराज ; महात्मा ज्योतिबा फुले आहेत. सावित्रीबाई फुले आहेत .छत्रपती शिवाजी महाराज;  छत्रपती संभाजी महाराज;  छत्रपती राजश्री शाहू महाराज; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. शिवाजी महाराज ;फुले शाहू आंबेडकर ही जगात महाराष्ट्राची ओळख आहे. या महापुरुषांची कोणत्याही आजच्या ब्रँडशी तुलना होऊ शकत नाही.त्यामुळे
महाराष्ट्राचा खरा ब्रँड शिवाजी महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ही जगात ओळख आहे.त्यामुळे महाराष्ट्रामुळे ठाकरे आहेत. ठाकरे मुळे  महाराष्ट्र नाही याची नोंद संजय राऊत  तुम्ही विसरतात.  आणि आपल्या नेत्याच्याप्रती चाकरी करताना;  भक्ती करताना तुम्ही इतकं डोक्यात हवा  घालतात की वस्तुस्थिती विसरता अरे  महाराष्ट्र मुळे तुमचा ठाकरे ब्रँड आहे तुमच्या ठाकरे ब्रँड मुळे महाराष्ट्र नाही.
रामदास आठवले असो बाळासाहेब ठाकरे शरद पवार  की आताचे  उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असो  या सर्वांना महाराष्ट्राने घडवले आहे. यांनी महाराष्ट्राला घडवीलेले  नाही .
शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर हे  महाराष्ट्राचा ब्रॅण्ड आहेत.  महाराष्ट्राची ही  ओळख आहे.
संजय राऊत आणि शिवसेना यांनी अनेकदा विरोधकांना कात्रीत पकडण्यासाठी शिवसेनेवरील टीका ही मुंबई आणि महाराष्ट्रावरील टीका आहे असा कांगावा केलेला आहे. पण शिवसेनेवरील टीका म्हणजे महाराष्ट्रावरील टीका नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत संजय राऊत असण्याचा प्रश्नच येत नाही पण शिवसेनेचा ही पत्ता नव्हता. हे लक्ष्यात घ्या. शिवसेना संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नव्हती मात्र महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवीण्यसाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ऐतिहासिक आहे.
महाराष्ट्र मध्ये पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीचे वादळ सुरू होत आहे. मराठा  आरक्षणाच्या हक्कासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करताना अनेकदा मराठा समाजाच्या तत्कालीन पुढाऱ्यांना  विनंती केली होती.  मराठा समाजाच्या आरक्षणाची   तरतूद करण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सुचवलं होतं.  त्या काळातील मराठा नेत्यांनी त्या दृष्टीने पाऊले  उचलली  नाहीत आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही.  त्यानंतरच्या काळामध्ये ८० च्या दशकात  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी पोटतिडकीने मागणी केली . नंतर लोकसभेमध्ये त्यांनी अनेकदा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मागणी केली.  महाराष्ट्रमध्ये त्यांनी दलित मराठा ऐक्य  परिषद घेतल्या.  रवींद्र नाट्यमंदिर मुंबई प्रभादेवी येथे मराठा आरक्षण हक्क परिषद केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीने आयोजित केली.  त्या परिषदेला दिवंगत काँग्रेस नेते  पतंगराव कदम सुद्धा उपस्थित होते.  मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण द्या ही रामदास आठवले यांची आंबेडकरी जनतेची मागणी आहे.  मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीआंबेडकरी जनतेने ही  पाठिंबा दिला
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले तरीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही.  मराठा समाजाच्या लोकांनी मूक मोर्चा काढला.  एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत मराठा आरक्षण  मूक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी  आपल्या सामना या वर्तमानपत्रातून मूक मोर्चाला’ मुका ‘मोर्चा असे संबोधणारे व्यंगचित्र प्रकाशित करून मूक मोर्चाची खिल्ली उडविली.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची खिल्ली उडविण्याचे काम संजय राऊत यांनी केलं होतं.
मराठा मराठी  महाराष्ट्राची भाषा करणारे संजय राऊत मराठा समाजाच्या  आरक्षणाच्या मूक मोर्चाला मुका  मोर्चा म्हणून त्याची खिल्ली उडवतात. संजय राऊत तुमच्या शिवसेनेचा  ब्रँड मराठा आरक्षणाच्या लढ्यात कुठे होता? मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मराठा समाजाची न्यायहक्काची लढाई आहे त्यांच्या लढ्याला रामदास आठवले या रिपब्लिकन ब्रँड ने आरक्षणाच्या ब्रँड ने पूर्ण साथ दिली आहे.
मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण ही भूमिका  त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.  ज्या दिवशी मराठा समाज जागा होईल आणि परिवर्तनाचा धागा होईल या दिवशी मराठा समाजाला रिपब्लिकन पक्षाचा;  आंबेडकरी विचारांचा निळ्या झेंड्याचे महत्त्व पटेल या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर रिपब्लिकन पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान  झाला पाहिजे .  रिपब्लिकन पक्षाची सत्ता राज्यात स्थापन होईल तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळेल. आरक्षणाचा खरा ब्रँड रिपब्लिकन पक्षाचे नेते  रामदास आठवले यांचे नेतृत्व आहे . आरक्षण म्हटलं रामदास आठवले आहे हे लक्षात घ्या आणि पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्राचा ब्रँड ठाकरे पवार  नाहीत.  ठाकरे पवार जर महाराष्ट्राचे ब्रँड  असतील तर आठवले सुद्धा ब्रॅंड आहेत हे लक्षात घ्या. महाराष्ट्राची खरी ओळख जर असेल तर ती शिवाजी महाराजांचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र  ही आहे.  शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर ही  सूर्यासारखी तेजस्वी नावे आहेत.  त्यांच्यासमोर काजव्यांचे नाव घेऊ नका समझनेवाले को इशारा काफी है.  संजय राऊत तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या ठाकरे महाराष्ट्रा चा ब्रँड आहे तर  आठवले सुद्धा ब्रॅंड आहे.

 562 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.