पाणी प्रश्नी आंदोलनाचा इशारा देताच आयुक्तांचे त्वरित ऍक्शन घेण्याचे आश्वासन

नवीन गृहसंकुलास मोठी जलवाहीनी टाकण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मंजुरी दिल्याने परिसारातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते

कल्याण : चाळकऱ्यांचे पाणी वळवून मोठ्या गृह संकुलास देण्याच्या प्रकारावर माजी नगरसेवकाने आंदोलनाचा इशारा देताच याबाबत पालिका आयुक्तांनी त्वरित ऍक्शन घेण्याचे आश्वासन दिले आहे.
कल्याण पूर्वेतील गणेश वाडी प्रभागातील शक्ती धाम मधील नवीन गृहसंकुलास बाजूच्या प्रभाग असलेल्या कोळसेवाडी विकासनगर पाण्याच्या टाकीतून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. कोरोनाच्या काळात कोणाचे लक्ष नसल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. या जलवाहिनी मुळे परिसरात अधीकच पाणी टंचाई समस्यां भेडसावणार असल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला येथील स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी विरोध केला.
पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग कोळसेवाडी परिसरातील गणेश वाडी प्रभागातील शक्ती धाम मधील नवीन गृहसंकुलास मोठी जलवाहीनी टाकण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मंजुरी दिल्याने या परिसारातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित थाबविण्यासाठी माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी पालिका आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता. पालिका आयुक्तांकडे रसाळ यांनी या जलवाहिनी मुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची सत्य परिस्थिती मांडल्याने अखेरीस पालिका आयुक्तांनी जलवाहिनी टाकण्याच्या कामाची चौकशी करून ऍक्शन घेतली जाईल असे आश्वासन दिल्याचे उदय रसाळ यांनी सांगितले.

 497 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.