प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी भय व तणाव अशा अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत असल्याने या मानसिक स्थितीशी सामना करण्यासाठी व मनोबल प्राप्त करण्यासाठी आनापान साधनेचा लाभ विद्यार्थी शिक्षक व अधिकारी या सर्वांना होऊ शकतो.
कल्याण : शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व विपश्यना विशोधन केंद्र इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आनापान साधना वर्ग सुरू आहे. सर्व माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक वाढीकरिता उपयुक्त आहे.
सध्या कोविड सारख्या महामारीच्या प्रसंगी समाजातील प्रत्येक घटक अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात असल्याने या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मन शांत आणि संतुलित राहणे खूप गरजेचे आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी भय व तणाव अशा अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत असल्याने या मानसिक स्थितीशी सामना करण्यासाठी व मनोबल प्राप्त करण्यासाठी आनापान साधनेचा लाभ विद्यार्थी शिक्षक व अधिकारी या सर्वांना होऊ शकतो.
मित्र उपक्रमांतर्गत दिनांक २४ व २५ सप्टेंबर रोजी सकाळी सात ते नऊ दरम्यान दोन तासाचे ऑनलाइन पद्धतीने यूट्यूब द्वारे आनापान साधनेचे प्रशिक्षण विपश्यना विशोधन केंद्र इगतपुरी यांच्या सहकार्याने राज्यातील सर्व शिक्षक व अधिकारी वर्गासाठी आयोजित केले आहे प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/LULZelm4pX4RPSGZ6 या लिंक वर जाऊन नोंदणी फॉर्म भरायचा आहे.
सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी विपश्यना केंद्र इगतपुरी येथे दोन वेळा दहा दिवसाचे मेडिटेशन शिबिर केलेले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सदर प्रशिक्षण फारच महत्त्वपूर्ण असून मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनापान प्रशिक्षण करण्यचे आवाहन करण्यात आले आहे.
1,009 total views, 1 views today