डोंबिवलीत ७५ खाटांचे ऑक्सिजन कोव्हीड सेंटर सुरू

मृत्‍यूदर कमी ठेवण्‍यात महापालिकेला यश  – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत लोकसंख्‍येची घनता जास्‍त असूनही मृत्‍यूदर कमी ठेवण्‍यात महापालिकेला यश आले असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज व्यक्त केले. महापालिकेच्‍या डोंबिवली पूर्व येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टाच्‍या जागेवर उभारण्‍यात आलेल्‍या कोविड समर्पित आरोग्‍य केंद्राच्‍या लोकार्पण सोहळयावेळी ते बोलत होते.
       वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रीडा संकुलातील लॉन टेनिस कोर्टवर उभारलेल्‍या कोविड सेंटरमध्‍ये ७५  ऑक्सिजन बेडची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली असून हे रुग्‍णालय वन रुपी क्लिनीकचे डॉ. राहूल घुले यांचेमार्फत चालविले जाणार आहे.
      बेड रिकामे राहिले तरी चालतील पण बेडस उपलब्‍ध न झाल्‍यामुळे रुग्‍ण दगावता कामा नये, सध्‍याच्‍या कोविडच्‍या वातावरणात पत्रकारांनी सकारात्‍मक बातम्‍या करुन सकारात्‍मकता पसरवणे गरजेचे आहे, असेही ते पुढे म्‍हणाले. पत्रकारांच्‍या मागणीनुसार पत्रकारांसाठी बेड आरक्षित ठेवण्‍याची व्‍यवस्‍था ठेवू, अशीही ग्‍वाही खासदारांनी  यावेळी दिली.
काळाची पाऊले उचलून सुविधा निर्माण करा, या शासनाच्‍या निर्देशानुसार महापालिकेने कोविडसाठी जम्‍बो फॅसिलीटी निर्माण केल्‍या व अजूनही करीत आहोत. आता प्रतिदिन ९०० रुग्‍ण सापडले तरी त्‍यादृष्‍टीकोनातून इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर तयार करीत असल्याचे पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. 

 530 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.