कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
कल्याण : रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रंलबित मागण्याविषयी कोकण विभाग रिक्षा टॅकसी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. रिक्षा टॅक्सी चालकांना आर्थिक मदत व प्रलंबित न्यायमागण्या संदर्भात भेट घेऊन निवेदन दिले. सरकार व परिवहन विभाग रिक्षा टॅक्सी चालंकाच्या मागण्यांविषयी सकारत्मक आहे. लवकरच परिवहन मंञी व संघटनाची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन परिवहन आयुक्तांनी दिले. याप्रंसगी राजन देसाई, तंबी कुरियन, विनायक सुर्वे, जितेद्र पवार, संतोष नवले आदी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.कोकण विभाग महाराष्ट्र राज्यातील रिक्षा व्यवसाय शासनाने खुल्ले केलेले रिक्षा परवाने व विविध कारणास्तव डबघाईला आलेला आहे. कोविड-१९ कोरोनाच्या संकट काळात रिक्षा/टॅक्सी अनेक महिने बंद असल्याने व मंदिमुळे रिक्षा/टॅक्सी व्यवसाय अत्यंत आर्थिक विळख्यात सापडला आहे. गेली अनेक वर्ष संघटनानी मागणी करूनही भाडेदर वाढ व प्रलंबित न्याय मागण्या या विषयी शासनाने काही एक निर्णय घेतलेला नाही. यामुळे शासन या मागण्यां विषयी गंभीर नाही व चालढकल करीत आहे अशी भावना तमाम रिक्षा टॅक्सी चालकांची झालेली आहे. त्यांच्यामध्ये असंतोष व प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे रिक्षा चालकांच्या मागण्यांविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
596 total views, 3 views today