२५२ जणांच्या जम्बो कार्यकारिणी, सक्रीय असलेल्या जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या सल्लागार समितीचे गठन
ठाणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी,देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे तत्कालीन प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,अ.भा.काॅग्रेसचे कोकण विभागीय प्रभारी बी.एम.संदीप यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहर(जिल्हा) काँग्रेसच्या नियोजित कार्यकारिणी समितीला मान्यता दिलेली आहे.
ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणीमध्ये विविध स्तरातील कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असताना पक्षाच्या स्थापनेपासूनच काँग्रेस पक्षाची”सर्वधर्मसमभाव”ही भूमिका असल्याने विविध समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही ही संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आम्ही मनापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांचे जाहीर आभार मानतो की आतापर्यंतच्या ठाणे काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच पंधरा दिवसातच नियोजित केलेल्या समितीला मान्यता देऊन ठाण्यातील कार्यकर्त्यांचा गौरव केला गेलाय,जिल्हास्तरीय विविध शासकीय समित्या,विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्ती बाबतही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पुढाकार घेऊन या नियुक्त्या लवकरात लवकर कशा होतील याकरिता प्रयत्न केले आहेत असे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
विक्रांत चव्हाण यांच्या ठाणे शहर(जिल्हा)कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये विविध जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना संधी देत असताना पक्षाचे काही माजी नगरसेवक,ठाणे महापालिका सदस्य यांच्याबरोबरच महिलांनाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला गेला आहे एकूण २५२ पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी मध्ये सर्वसाधारण गटातील ११६ इतर मागासवर्गीय,अल्पसंख्यांक वर्गातील एकुण ३६ कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे या कार्यकारिणीत काँग्रेस पक्षातील मागासवर्गीय समाजातील
२५ कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यात आला आहे एकूणच सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी गठीथ करीत असताना पक्षांतर्गत असलेल्या ब्लॉक रचने प्रमाणे कार्यकारिणीचा समतोल राखला गेला आहे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागात संघटना बांधण्याचा प्रयत्न करीत असताना प्रभागातील प्रमुखांना ठाणे शहर कार्यकारिणीवर संधी घेऊन आगामी ठाणे महापालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याची सुरुवात असेल असे याठिकाणी आणि आवर्जून नमूद करीत आहे.काॅग्रेस पक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय असलेल्या जेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्याची एक सल्लागार समिती बनविण्यात आली असून पक्ष वाढीसाठी वेळोवेळी या समितीचा सल्ला घेणार आहे असे चव्हाण म्हणाले.
नव्यानं गठित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे शहर कार्यकारीणीत सरचिटणीस म्हणून सचिन शिंदे हे संपूर्ण प्रशासकीय कामकाज पाहणार असून जिल्हा काँग्रेसचा मुख्य प्रवक्ता असतील. इतरही उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस,कार्यकारिणी सदस्य यांनाही महत्वपूर्ण जबाबदारी लवकरच देण्यात येईल यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार प्रामुख्याने ब्लॉक समन्वयक,पक्षांतर्गत असलेले विविध सेल, विभाग समन्वयक,प्रभाग समन्वयक अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत प्रामुख्याने बुथ स्तरापासूनच काँग्रेस पक्षीय संघटना बांधणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ही शहर कार्यकारणी कार्यरत राहील भविष्यात काँग्रेस अधिकाधिक व्यापक स्वरूप धारण करेल असा ठाम विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले.
563 total views, 1 views today