कोरोना महामारीचा सामना करणार्या योध्दांचा सेवेकरीता समाजातील विविध संस्था, संघटनांनी त्यांना आप आपल्या परीने केली होती मदत
ठाणे : कोरोना महामारीने जगात थैमान करीत असताना त्या महामारीचा सामना करणार्या योध्दांचा सेवेकरीता समाजातील विविध संस्था, संघटनांनी त्यांना आप आपल्या परीने मदत केली. ते कोविड योध्दे पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी इत्यादी क्षेत्रातील योध्दे युध्द करीत असताना त्यांना मदत करणार्या सामाजिक संघटनांचा ठाणे नगर पोलिसांच्या पोलीस उपायुक्त बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त पडवी आणि व. पोलीस निरीक्षक सोमवंशी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
ठाण्यातील काही सामाजिक संस्था श्री ॠंषभजी महाजन जैन धर्म टेम्पल व धंब्ती ट्रस्ट, श्री ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्ट , हलाई लोहाना फाऊंडेशन,एन.के.टी. चॅरीटेबल ट्रस्ट, ईज आयनेज प्रिन्स आगा खान शिया ईस्माइली जमान खाना, महागिरी वेल्फेअर कमिटी, श्री ॠंषभजी महाजन जैन धर्म टेम्पल व धंब्ती ट्रस्ट उदय परमार, संपत चोप्रा, भरत, पुनमिया, प्रविण राठोड, सुरेश छाजड, श्री ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्ट , हलाई लोहाना फाऊंडेशन केतन ठक्कर, जितेंद्र प्रभाकर बुराडे, जयंत मगनलाल गणात्रा, मनोज नरेंद्र ठक्कर, गिरीष रतीलाल देडीया, रवी लक्ष्मीदास गोकाणी, एन.के.टी. चॅरीटेबल ट्रस्ट शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, जितेंद्र नानजी ठक्कर, मनोज सिंग, मनिष मंगला, समीर काझी, ईज आयनेज प्रिन्स आगा खान शिया ईस्माइली जमान खाना, मेहंदी मोहम्मद पठाणिया,निजार अमीरअली डोबानी, डॉ. सॅम पिटर न्युटन,महागिरी वेल्फेअर कमिटी के.पी. आहम उबेद इत्यादी सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकार्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना मदत म्हणून अन्न, पाणी, औषधे यांचे वाटप केले होते. तसेच, पोलीस मित्रांनीही पहाटे चार वाजेपासून बंदोबस्तात सहकार्य केले होते. या सर्वांचा महाजन वाडी येथे झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
551 total views, 1 views today