अभियंता दिनानिमित्त महावितरणच्या ५२ अभियंत्यांचे रक्तदान

कोरोनावर मात केलेल्या सहा अभियंत्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी आवश्यक चाचणीसाठी दिले रक्ताचे नमुने.

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयात अभियंता दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोशिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात ५२ अभियंत्यांनी रक्तदान केले. तर कोरोनावर मात केलेल्या सहा अभियंत्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी आवश्यक चाचणीसाठी नमुने दिले.
मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संघटनेकडून आयोजित रक्तदानाच्या उपक्रमाचे कौतुक करत मुख्य अभियंता अग्रवाल यांनी स्वतः या शिबिरात रक्तदान केले. संघटनेचे पदाधिकारी श्रीनिवास बोबडे, रवींद्र नाहीदे यांच्यासह ५२ जणांनी या शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान केले. तर कोरोना आजाराचा यशस्वीपणे सामना केलेल्या सहा अभियंत्यांनी प्लाझ्मा दान करण्याची तयारी दर्शवत त्यासाठी आवश्यक नमुने चाचणीसाठी दिले. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील काकडे, प्रवीण परदेशी, संघटनेचे पदाधिकारी बोबडे, नाहीदे यांच्यासह परिमंडलातील अभियंते उपस्थित होते.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.