जिजाऊ संस्थेतर्फे वासिंदसाठी मोफत रूग्णवाहिका

कोरोनो च्या संकट काळात मोफत रूग्णवाहिका सेवा मिळाल्यामुळे गरीब गरजू रुग्णांची सोय होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे.

शहापुर (शामकांत पतंगराव) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे वासिंद शहरातील नागरिकांसाठी रूग्णवाहिका देण्यात आली असून सोमवार (ता. १४) पासून ही मोफत रूग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक सामाजिक व आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, निलेश सांबरे, जिल्हाप्रमुख, मोनिकाताई पानवे, शहापूर तालुका अध्यक्ष, हरेश पष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिंद व परिसरातील नागरिकांची व रूग्णांची कोरोना साथीच्या पार्श्र्वभूमीवर गरज लक्षात घेऊन ही मोफत रुग्णसेवा देण्यात येणार आहे. वासिंद शहराची झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या व कोरोनो च्या संकट काळात मोफत रूग्णवाहिका सेवा मिळाल्यामुळे गरीब गरजू रुग्णांची सोय होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे. वासिंद व परिसरातील ग्रामिण भागातील नागरिकांसाठी ही रूग्णवाहिका २४ तास मोफत उपलब्ध असेल, अशी माहिती संस्थेचे वासिंद विभागीय अध्यक्ष, अमोल गोरले व वासिंद शहर अध्यक्ष, परेश शेलार यांनी दिली आहे. यावेळी संस्थेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 518 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.