शेरे- शेंद्रुण -किन्हवली रस्ता झाला चकाचक

भाजपाचे पदाधिकारी सतीश सापळे यांच्या पाठपुराव्याला यश

शहापूर(शामकांत पतंगराव) : शहापुर तालूक्यातील काही गावांना किन्हवली सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी असलेला दळणवळणाचा मुख्य मार्ग तसेच टोकावडे मार्गे माळशेजघाट व पुढे अहमदनगर, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षित मार्ग म्हणजे वासींद- शेरे- शेद्रूण- अल्याणी-गेगांव- किन्हवली-सो -कोचरे
(प्र.जि.मा.६२) या साधारण ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते.
हा रस्ता अरुंद व अवघड वळणा वळणाचा असल्याने ईथे सतत किरकोळ अपघात होत असतात. पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा गवत व झाडे झुडपे वाढल्याने समोरून आलेले वाहन दिसत नाही.या परीसरात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची गुरे रस्त्यालगत माळरानावर चरत असतात.त्यातील एखादे जनावर अचानक रस्त्यावर गवत खाण्यासाठी आले तर मात्र अपघात होण्याची दाट शक्यता असते.
या बाबत भारतीय जनता पार्टीच्या जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सतिश सापळे यांनी आपले सहकारी कार्यकर्ते प्रेम बोटकोंडले,केशव भाकरे,गणेश वाळींबे यांच्यासह सा.बा. उपविभाग शहापूर येथील शाखा अभियंता बच्छाव ,उपविभागिय अभियंता जाधव यांची भेट घेवून रस्ता साफ करण्यासंर्दभात निवेदन दिले होते त्याची तात्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता मजुरांकरवी चकाचक करून घेतल्याने हा रस्ता आता सुरक्षित झाला आहे.या रस्त्यावरून नित्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सतीश सापळे व सहकार्याचे आभार मानले आहेत.

 551 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.