सामाजिक जाणिव उपक्रमांतर्गत वह्या वाटपाचा शुभारंभ

गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ५०००वह्यांचे वाटप करण्यात येणार

शहापुर (शामकांत पतंगराव) : शहापुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनाचे प्रमुख बबन हरणे यांच्या वतीने सामाजिक जाणिव उपक्रमंतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ५०००वह्यांचे वाटप करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेन्टर येथील कार्यालयात नुकताच करण्यात आला , दरवर्षी प्रमाणे यंदा ही गरीब मुलांना मदत म्हणून वह्या वाटप आणि इतर गरिबांना मदत करीत असलेले बबन हरणे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगून हरणे यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या ,
धसई गावच्या पहिल्या महिला उपसरपंच गुलाब किसन भोईर यांनी गावात विकासात्मक अनेक कामे करून गावाचा कायापालट केला असून त्यांच्या कामाची चित्रफीतिचे अनावरण सुद्धा या वेळी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी धसई ग्रामपंचायतच्या माजी सरपंच गुलाब भोईर ,शशीकांत भोईर ,अबूबकर शेख ,वैभव भोईर आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .

 450 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.