कोविड 19 अॅन्टीजन चाचणी शिबिराचे आयोजन


       

शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली

ठाणे : लाॅकडाउन उठल्यानंतर काही प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या कमी होते असे वाटत असताना अचानक या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या धर्तीवर ठाणे शहर काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन शिदे यांनी प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांकरिता मोफत कोविड १९ अॅन्टीजन चाचणी शिबिराचे आयोजन केले होते
  महागिरी येथील अजुमन खैरूल इस्लाम हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली ठाणे महानगरपालिकेच्या वाडीया रूग्णालयातील वैद्यकीय अधिका-यानी या नागरिकांची तपासणी करण्यात आली या प्रसंगी युवक काँग्रेस प्रभाग अध्यक्ष प्रविण खैरलीया, ऍड. हिदायत मुकादम आदि पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना सचिन शिंदे यांनी सांगितले की लाॅकडाउन उठवल्यानतरच्या काही काळ रूग्णांची सख्या घटली असे वाटत असतानाच आता परत आपल्या ठाण्यात रूग्ण संख्या वाढत चालली आहे म्हणून आमच्या भागातील नागरिकांकरीता काँग्रेसच्या वतीने हे शिबिर आयोजित केल असून उद्या पण हे शिबिर चालू राहणार असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 373 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.