तरुणींना डांबून ठेवणे ही भाजपची स्टंटबाजी : नजीब मुल्ला

पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची केली मागणी

ठाणे : काही दिवसांपूर्वी इंजिनिअरिंग तरुणीची सुटका केली असल्याचे सांगण्यात आले होते. यावर संशय व्यक्त केला जात असून तरुणींना डांबून ठेवणे म्हणजे भाजपची एकप्रकारे स्टंटबाजी असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी लवकरत लवकर याचा सखोल तपास करावा अशी मागणी देखील मुल्ला यांनी केली आहे.
ठाणे महानगर हद्दीत ठाणे महानगरपालिका हद्दीतील येऊर येथील पाटोणापाडा या ठिकाणी मागील दहा दिवसापासून कोरोना संदर्भात संशोधन व व्हेंटिलेटर तयार करण्याच्या आमिषाने एका सुपरवासी नावाच्या एनजीओने वैद्यकीय कामाच्या बहाण्याने काही इंजिनियर तरुणांना डांबून ठेवले होते. उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना या एनजीओने ऑनलाइन पोर्टल वरून मेडिकल रिसर्च करण्याच्या नावाखाली जॉब देण्याचे आमिष दाखवून ठाण्यात बोलावले होते, मात्र त्यांना कोणतेही काम न देता एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. ज्या खोलीत या तरुणी राहत होत्या त्या ठिकाणी अनेक छुपे कॅमेरे लावण्यात आले होते.
याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने बुधवारी सायंकाळी या तरुणींची सुटका केली मात्र, या संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्याची माहिती अद्याप वर्तकनगर पोलीस स्थानकाकडून प्राप्त झालेली नाही. येऊर येथे काम करणाऱ्या या एनजीओ चा महिला दिन व  होलिका उत्सव निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यामुळे एका बाजूला संस्थेचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या गैरकृत्य बाबत पोलीस स्थानकात गुन्हा न नोंदवता स्टंटबाजी करायची ही भाजपची खेळी आहे असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला.  यावरून नक्कीच वस्तुस्थिती काय आणि प्रसिद्धीसाठी केलेल्या स्टंटबाजी मुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून सदर प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात यावी व संबंधित गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.

 395 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.