कोव्हीडचे कारण सांगत अप्रोहला नाकारली उपोषणाची परवानगी

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे लिखित स्वरूपात मांडली कैफियत

ठाणे : राज्यशासनाच्या २१/१२/२०१९ मधील ४.२नुसार सेवेत सामावून घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्यामुळे आज ७ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्यासाठी आफ्रोह, ठाणे शाखेने परवानगी मागितली होती. परंतु कोव्हीडचे कारण सांगत जिल्हा प्रशासनाने उपोषणाला परवानगी नाकारली. त्यावेळी आफ्रोहच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. सेवासमाप्त कर्मचाऱ्यांच्या अन्यायाबाबत त्यांना सेवेत लवकरात लवकर घेण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंबई, नवी मुंबई, ठाणे व कल्याण तसेच इतर ठिकाणाहून सेवासमाप्त कर्मचारी, सेवा निवृत्त कर्मचारी व अधिसंख्य कर्मचारी उपोषणाला बसण्यासाठी गोळा झाले होते. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी अभिप्राय देऊन पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे असं अप्रोह ठाणे जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 460 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.