४ बांधकामे आणि १०५ हातगाड्यांवर कारवाई
ठाणे : अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरोधात कालपासून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेली कारवाई आज दुसऱ्या दिवसीही सुरूच असून या कारवाईमध्ये आज एकूण चार बांधकामे जमीनदोस्त करण्याबरोबरच १०५ हातगाड्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली.
कालपासून ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकूण ४ अनधिकृत बांधकामे आणि १०५ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दिवा प्रभाग समितीतंर्गत दोन आरसीसी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली तर माजिवडा –मानपाडा प्रभाग समितीतंर्गत एक आणि कळवा प्रभाग समितीतंर्गत एक आरसीसी बांधकाम तोडण्यात आले. दरम्यान आज प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये संपूर्ण शहरामध्ये एकूण १०५ हातगाड्या तोडण्यात आल्या. सदरची कारवाई परिमंडळ उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त यांनी पोलिस बंदोबस्तात केली.
589 total views, 1 views today