पॉलिसी हप्ता भरण्यासाठी एलआयसीने काही सवलती द्याव्यात

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची विनंती

मुंबई : कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एलआयसीने पॉलिसीधारकांना त्यांचे हप्ते भरण्यात मुदतवाढ द्यावी. विलंब शुल्क आकारली जाऊ नये, ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रांची पुर्ततेसाठी स्वतंत्र सेल सुरु करुन घरपोच सेवा द्यावी, अशा विविध विषयांकडे लक्ष वेधीत आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी एलआयसीच्या चेअरमन एम.आर कुमार यांची आज भेट घेतली.
कोरोना मुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले असून एलआयसीच्या पॉलिसीचे हप्ते वेळेत न भरल्यास भविष्यात मिळणाऱ्या फायद्यापासून नागरिक वंचित राहुन त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलआयसीने प्राप्त परिस्थितीत काही सवलती देण्याची गरज असल्याकडे आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोना व्हायरस सर्व देशभरातील परिस्थितीचा विचार करता,  एलआयसीने नागरिकांना आणि एलआयसी पॉलिसीधारकांना या वर्षाच्या विम्याच्या हप्ते संदर्भात काही सवलती देण्याची गरज आहे. विशेषतः या आर्थिक वर्षासाठी विलंब झालेल्या पॉलिसी हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दिली जावी. या आर्थिक वर्षासाठी पॉलिसीधारकांद्वारे पॉलिसी प्रीमियमच्या विलंब देयकासाठी विलंब शुल्क आकारले जाऊ नये.  ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कागदपत्रे व हप्ते भरण्यासाठी घरपोच सेवा देण्यासाठी एका स्वतंत्र सेलची स्थापना करण्यात यावी अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

 500 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.