तापमानातील चढ उतारामुळे सर्दी-खोकला आणि तापाची साथ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये घबराट

शहापूर (शामकांत पतंगराव) : चार पाच दिवसांपासून हवामानात सारखा बदल होत असून तापमानातील चढ उतारामुळे शहापुर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या
सर्दी-खोकला आणि तापाची साथ पसरली असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये घबराट पसरली असून कोणीही गैरसमज करून घेऊ नये असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
गणेशोत्सव काळात सतत पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा होता.मात्र चार पाच दिवसांपासून तापमानात होत असलेला चढउतार आणि कडक ऊन व संध्याकाळी पडणार पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे सध्या शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्दी-खोकला आणि तापाची साथ पसरली असून, दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. 
गेल्या तीन-चार दिवसांपासून तपमानात चढउतार होत असून, दुपारी कडक ऊन पडलेले असतानाच रात्री गारवा,
मध्येच ढगाळ वातावरणही निर्माण होत आहे. या बदलत्या हवामानामुळे विषाणूजन्य आजारांची लागण नागरिकांना होत असून, सर्दी-पडसे, ताप, खोकला यांची साथ पसरली आहे. , तर खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. 
या बदलत्या हवामानामुळे अंगदुखी, संधिवात, घसा खवखवणे, दम्याचा 
त्रास आदि आजारांचाही सामना नागरिकांना करावा लागतो आहे. 
सर्दी-खोकल्यामुळे मेडिकल स्टोअर्समध्ये कफसिरफ,सर्दी व तापाच्या औषधांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. याशिवाय लोक घरगुती उपचारांवरही भर देताना दिसून येत आहेत.
हे आजारांचे कोरोना व्हायरसच्या आजाराशी साधर्म्य असल्यामुळे रुग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
“रुग्णाला खोकला व बोलताना चालताना दम लागत असेल तर त्याने प्रथम नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन नोंद करावी व उपचार घ्यावेत.त्यानंतरही वारंवार त्रास जाणवत असेल तर मात्र कोरोना चाचणी करून घ्यावी !” असे शहापूर पंचायत समितीच्या तालुका वैद्यकीय अधिकारी
डॉ.तरुलता धानके यांनी सांगितले.

 568 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.