सद्य परिस्थिती पाहता सबधितांवर निलंबनाची कारवाई न करण्याचीही केली प्रशासनाला विनंती
ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा- कौसा- शिळ भागात चालविण्यात येणार्या टीएमटी बसगाड्यांचे कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात होत्या. त्यामुळे परिवहन सदस्य शमीम खान यांनी चक्क स्टींग ऑपरेशन करुन कामचुकार कर्मचार्यांना चांगलाच दणका दिला. मात्र, त्यानंतरही मानवतेच्या दृष्टीकोनातून शमीम खान यांनी या कर्मचार्यांना धडा शिकवा; परंतु, त्यांना निलंबित करु नका, अशा सूचना परिवहन व्यवस्थापकांना करुन आपल्यातील सहृदयी माणसाचे दर्शन घडविले आहे.
गेल्या काही दिवसांपासून टीएमटी सेवेबाबत प्रवाशांकडून शमीम खान यांच्याकडे तक्रारी केल्या जात होत्या. त्यानुसार, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या सूचनेनुसार ठामपा गटनेते, नजीब मुल्ला, विरोधी पक्ष नेत्या प्रमिला केणी, ऋता आव्हाड, नगरसेवक शानू पठान यांच्या मार्गदर्शनाखाली शमीम खान यांनी स्टींग ऑपरेशन केले.
शमीम खान यांनी आपल्या खांद्यावर लॅपटॉपची बॅग अडकवून शमीम खान यांनी त्यांच्या अन्य काही सहकार्यांसह मुंब्रा येथील परिवहनच्या बसमध्ये प्रवासी बनून केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रवाशांच्या विनंतीनंतरही बस न थांबवणे, मुंब्रा रेल्वेस्थानकापाशी बसचा थांबा असतानाही ती उड्डाणपुलावरून नेणे, प्रवाशांनी बिनधास्त विनातिकीट प्रवास करणे अशा त्रुटी आढळल्या. खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याबरोबर बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. त्याचबरोबर एका थांब्यावर चढलेला प्रवासी दुसर्या थांब्यावर तिकीट न घेता उतरल्याचे सदस्यांना आढळून आले
ही बाब शमीम खान यांनी परिवहन व्यवस्थापक किशोर गवस यांना कळवताच त्यांनी बेजबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी इतर माध्यमातून त्यांना धडा शिकवा, अशी मानवतावादी भूमिका शमीम खान यांनी घेतली.
दरम्यान, शमीम खान यांच्या सूचनेवरुन टीएमटीच्या अधिकार्यांनी मुंब्रा-कौसा भागाचा दौरा केला. या दौर्यामध्ये रेती बंदर ते कौसा दरम्यान ३९ बस थांबे उभारण्याचे सूचना जारी करण्यात आले.
या स्टींग ऑपरेशनमध्ये शमीम खान यांच्यासह मुमताज शाह, मुफ्ती अशरफ, जावेद मॅडिकल, मुन्ना चौगले, इम्तियाज उर्दू, मेहफुज मामा, रफी मुल्ला आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
444 total views, 1 views today