फुफ्फुसांचे ४५ टक्के नुकसान होऊनही ९६ वर्षांच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

“फुफ्फुसांच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या  गव्हाणपाडा-मुलुंड पूर्व येथे राहणाऱ्या ९६ वर्षाच्या आजी अपेक्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर स्थितीत आल्या होत्या. कोविड -१९, न्यूमोनिया आणि श्वसन बिघाडासह सर्दी खोकला याची लागण तसेच शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाली होती.

मुंबई : जागतिक पातळीवर कोरोना विषाणूमुळे कहर निर्माण झाला असून अजूनही परिस्थिती नियंत्रणात येत नाही आहे ; जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमित प्रकरणांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर मृत्यूंपैकी तो चौथ्या क्रमांकावर आहे. पॉझिटिव कोरोनाव्हायरसची एकूण संख्या आता ३६२४६१३ च्या वर आहे परंतु आनंदाची बातमी म्हणजे  भारतात कोरोनातून बरे होण्याचा दर वेगाने वाढत आहे.  महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त कोव्हिड रुग्ण असलेले राज्य आहे. परंतु राज्यातील विविध भागांतून एक चांगली बातमी येत आहे जिथे कोरोना संक्रमणातून ९० वर्षांवरील वृद्ध नागरिक बरे होत आहेत. अशाच एक ९६ वर्षाच्या आजी ( नाव मालती दुर्वे ) ज्यांना आयएलडी म्हणजे इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार होता  व त्या कोरोना पॉजिटीव्ह झाल्या; परंतु १९ दिवस मुलुंड येथील अपेक्स  हॉस्पिटलमधील आयसीयु मध्ये राहून कोरोना व्हायरसशी यशस्वीपणे लढा दिला आहे. आधीच वयासोबत येणाऱ्या आजारांमुळे  ग्रस्त असलेल्या व्यक्तीला  कोरोना पॉजिटीव्ह होणे व त्यातून त्यांना वाचविणे हे  अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांसमोर  एक मोठे वैद्यकीय आव्हान होते. याविषयी अधिक माहिती देताना  अ‍ॅपेक्स हॉस्पिटलचे सल्लागार एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ  डॉ. हार्दिक ठक्कर सांगतात , “फुफ्फुसांच्या आजारामुळे त्रस्त असलेल्या  गव्हाणपाडा-मुलुंड पूर्व येथे राहणाऱ्या ९६ वर्षाच्या आजी अपेक्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर स्थितीत आल्या होत्या. कोविड -१९, न्यूमोनिया आणि श्वसन बिघाडासह सर्दी खोकला याची लागण तसेच शरीरातील  ऑक्सिजनची मात्रा कमी झाली होती.  ९ ऑगस्ट २०२० रोजी या आजी आमच्या मुलुंड येथील अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये भरती झाल्या; त्यांना  तातडीने आयसीयूमध्ये दाखल करून बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर ठेवले.  वैद्यकीय चाचण्यांमधून त्यांच्या  फुफ्फुसांचे ४५ % नुकसान झाल्याचा रिपोर्ट आला होता. आजीबाईंच्या कुटुंबियांनी आशा सोडल्या होत्या. या  सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर व दृढनिश्चयाने आणि अचूक उपचार प्रोटोकॉलसह आम्ही तिच्यावर  योग्य उपचार केले. आमची १० जणांची टीम दिवसरात्र त्यांच्यावर लक्ष देऊन होती.  आमच्या प्रयत्नांना यश आले व आम्ही या आजीबाईंना १९ दिवसानंतर आयसीयूच्या बाहेर स्थानांतरित केले.  सामान्य वॉर्डमध्ये आणखी ३ दिवस ठेवल्यावर त्यांची कॉव्हिड चाचणी निगेटिव्ह आली, त्यानंतर २२ व्या दिवशी तिला अनुनासिक ऑक्सिजनसह घरी सोडण्यात आले. ”
वयोमानानुसार  शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे  वृद्ध व्यक्तीना  कोरोनाव्हायरसच्या बाबतीत अधिक धोका असतो , त्यातच हृदयरोग, फुफ्फुसाचा रोग, आणि मधुमेह किंवा मूत्रपिंडाचा रोग असेल व कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला  तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो  जगभरात करोना या साथीच्या उद्रेकात बळी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. या आजाराचा धोका सर्वाधिक वृद्ध व्यक्तींना असल्याचेही सांगितले जात आहे अशी माहिती अपेक्स  हॉस्पिटलचे एमडी फिजिशियन, संसर्गजन्यरोगतज्ञ  डॉ. हार्दिक ठक्कर यांनी दिली

 308 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.