कल्याणमध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन

दार उघड उद्धवा दार उघड माजी आमदार नरेंद्र पवारांचे आवाहन  
 
कल्याण : मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करावी या मागणीसाठी आज राज्यभरात भाजप तर्फे मंदिरात घंटानाद आंदोलन छेडण्यात आले. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेकडील बेतूरकर पाडा परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरात भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक व माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भाजप पदाधिकारयासह घोषणाबाजी करत घंटा नाद आंदोलन केले.
यावेळी पवार यांनी सरकारने जशी इतर ठिकाणी सोशल डिस्टनसिंग सह इतर नियनाबाबत सूचना करत परवानगी दिली आहे. तशीच मंदिरात भाविकांना दर्शना साठी  देखील परवानगी देत  भाविकांना दर्शनासाठी मंदिरे लवकरात लवकर खुली करावी अशी मागणी केली.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सह अनिल पंडित, विशाल शेलार, गणेश गायकर, प्रताप टूमकर,  अशोक शिंदे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. तर टिटवाळा येथे मांडा टिटवाळा अध्यक्ष शक्तिवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर, राजाभाऊ पातकर, संतोष शिंगोळे यांनी तसेच गौरी पाडा तलाव येथे शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, नगरसेवक दया गायकवाड, लालचौकी येथे प्रिया शर्मा, भावना मनरेजा आदींनी घंटानाद आंदोलन केले.

 529 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.