सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली किन्हवलीत घंटानाद आंदोलन

“दार उघड उद्धवा,दार उघड”…. भाजपा कार्यकर्त्यांचा टाहो

शहापूर (शामकांत पतंगराव) : मंदिरे व धार्मिक संस्थाने सुरू करा या मागणीसाठी आज किन्हवली विभाग भाजपतर्फे किन्हवली(तालुका शहापुर) येथील हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भिवंडी मतदार संघाचे खासदार कपिल पाटील व भाजपचे ठाणे जिल्हा प्रमुख आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व भाजपाचे गटनेते सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली आज(दि.२९ रोजी) किन्हवली हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन
करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश विशे,भाजपचे जेष्ठ नेते गणपत शिद ,विभागप्रमुख अशोक गगे,किन्हवली गणाचे शक्तिकेंद्रप्रमुख नितिन ठाकरे,किन्हवली शहरप्रमुख भरत यशवंतराव,महेश सोनार,सुरेश चौधरी,युवानेते भावेश विशे ,भावेश देशमुख आदी भाजपा कार्यकर्ते या समर्थनार्थ घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.
मंदिरे सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्रातिल विविध धार्मिक संघटना, प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी “दार उघड उद्धवा दार उघड” आज भाजपने सर्वत्र घंटानाद आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या किन्हवली विभागातर्फे हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले.

 588 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.