माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशन व आर. एस. पी. अधिकारी शिक्षक कल्याण – डोंबिवली युनिटने सामाजिक बांधिलकी जपत राबवला उपक्रम
कल्याण : कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशन व आर. एस. पी. अधिकारी शिक्षक कल्याण – डोंबिवली युनिटने सामाजिक बांधिलकी जपत जीवन संवर्धन फाउंडेशन म्हसकळ, पारस बालभवन म्हसकळ, व अंकुर बालविकास केंद्र टिटवाळा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत लहान बालकांना खाऊ दिला. तसेच वृक्षारोपण देखील करण्यात आले.
खरा परमेश्वर हा मूर्तीत नसून तो निराधार, अनाथ, गरीब, गरजू , दुर्बल अशा घटकांत वसलेला आहे व तो देव शोधण्याचे काम या दोन संस्थानी केले आहे. अन्नधान्य किट वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून या दोन संस्थानी अनेक पगाराविना अडचणीत सापडलेल्या शिक्षकांना व अनेक गरीब – गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. टिटवाळा येथील बालकाश्रम येथे २०० किलो तांदूळ, १०० किलो गहू, साखर २५ किलो, बिस्कीट पॉकेट, ज्यूस, तेल २५ किलो, च्यवनप्राश आदी जीवनावश्यकवस्तू ची मदत केली.
याप्रसंगी हे साहित्य माजी आमदार नरेंद्र पवार, ठाणे – पालघर वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष विष्णु सांगळे, उद्योजक व समाजसेवक राजाभाऊ पातकर, मांडा-टिटवाळा भाजपा अध्यक्ष शक्तिवान भोईर, स्पोर्ट्स हेल्प फाउंडेशन सचिव अविनाश ओंबासे, आर एस पी कमांडो मनिलाल शिंपी यांचा हस्ते देण्यात आले. तसेच या तीनही ठिकाणी सर्व बालकांना व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
दरम्यान नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात गुरवारी मोफत अँटीजन टेस्ट शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६० नागरिकांनी टेस्ट केली. त्यापैकी १५ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारार्थ टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले.
560 total views, 2 views today