शेखर चन्ने, तुकाराम मुंडे यांच्यासह १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अण्णासाहेब मिसाळ कोकण विभागाचे नवे विभागीय आयुक्त

मुंबई : राज्यातील आज प्रमुख १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासह शेखर चन्ने, अण्णासाहेब मिसाळ, लोकेश चंद्रा यांच्यासह अन्यांचा समावेश आहे.
नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पदी करण्यात आली आहे. लोकेश चंद्रा यांची बदली जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एस.एम.देशपांडे यांची बदली सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली. अंशु सिन्हा यांची सामान्य प्रशासन विभागातून कौशल्य विकास व रोजगार विभागाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
शेखर चन्ने यांची एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक आणि आणि उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
अण्णासेहब मिसाळ यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
एन. रामास्वामी यांची मेरिटाईम बोर्डाच्या सीईओ पदावरून हेल्थ मिशनच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
राधाकृष्ण बी यांची बदली तुकाराम मुंडे यांच्या जागी नागपूरच्या पालिका आयुक्त पदी करण्यात आली आहे.
विमला आर. यांची राष्ट्रीय ग्रामीण लायव्हलीहूड मिशन नवी मुंबई येथे मिशन संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
डॉ.एन.बी. गिते यांची महानंदमधून एम.एस.इलेक्ट्रीक डिस्ट्रीब्युशन कंपनीच्या सह संचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
अविनाश ढाकणे यांची परिवहन आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. के.व्ही. जाधव यांची नेमणूक नाशिक महापालिकेच्या आयुक्त पदी करण्यात आली.
सी.के. डांगे यांची अंडर वॉटर सर्व्हेच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. दिपा मुधोळ-मुंडे यांची जलस्वराज प्रकल्पाचे व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली.
एस.एस.पाटील यांची सिडकोच्या सहसंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. रोहन घुगे यांची इंटेग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट चंद्रपूरच्या सब डिव्हीजनच्या प्रोज्कट ऑफिसर म्हणून बदली करण्यात आली.
या सर्व १६ आयएएस अधिकाऱ्यांना तातडीने नव्या पदाची जबाबदारी स्विकारून त्यासंबधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सिताराम कुंटे यांनी दिले.

 438 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.