केडीएमसी आयुक्तांविरोधात राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागरिक हक्क संघर्ष समितीने आयुक्त भेट नाकारत असल्याचा केला आरोप, कोरोना संदर्भात चर्चेसाठी उचलले पाऊल

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यात पालिका प्रशासनाला अपयश येत आहे. असे असतांना कोरोना संदर्भात काही उपाययोजना सुचविण्यासाठी नागरी हक्क संघर्ष समितीच्यावतीने निवेदन देत आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र आयुक्तांनी ५ वेळा भेटीसाठी ब=वेळ देऊनही भेट नाकारत असल्याच्या निषेधार्थ नागरी हक्क संघर्ष समिती आक्रमक झाली असून पालिका आयुक्तांची राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कल्याण मधील नागरिक हक्क संघर्ष समितीने कोरोना काळात कोरोना रुग्णावर मोफत उपचार, कोव्हिडं सेंटर व रुग्णालयात मानसोपचार तज्ञ नेमणे,रुग्ण वाहिका व शव वाहिनीची मोफत सुविधा, सर्व स्मशान भूमीत डिझेल, विद्युत गॅस दाहिनी तत्काळ सुसज्ज करा, तात्पुरत्या दवाखान्यावर अस्थायी व अवास्तव खर्च करण्यापेक्षा डोंबिवली शास्त्री नगर व कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयांची सेवा  काही दिवसांकरिता दुसरीकडे वर्ग करत या कालावधीत ही दोन्ही रुग्णालये सुसज्ज करा, कोव्हिड काळातील मालमत्ता व पाणी पट्टी माफ करा अशा काही सूचना करत पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी याना निवेदन देत भेट देण्याची मागणी केली होती.
पाच वेळा वेळ दिल्यानंतर देखील आयुक्तांनी भेट नाकारल्याने समितिने पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. आयुक्तांना  सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यास वेळ नसल्याने आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध केला. तसेच आयुक्तांची तक्रार मुख्यमंत्री व राज्यपालांकडे केल्याचे सांगितले. तसेच पालिका प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडणार असल्याचे देखील सांगितले.
या पत्रकार परिषदेत समितीचे बाबा रामटेके, इरफान शेख, अण्णा रोकडे, डॉ. गिरीश लटके, डॉ. संजय कुकडे, कॉम्रेड काळू कोमासकर, राजा आक्केवार, कॉम्रेड उदय चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

 503 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.