शहापुरात गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी फ़िरते विसर्जन केंद्र

साई कला अकॅडमीने राबवली संकल्पना

शहापुर ( शामकांत पतंगराव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव सामाजीक भान जपत साजरा करावयाचा आहे. हे लक्षात घेऊन येथील साईकला अकॅडमीचे अध्यक्ष कल्पेश अग्रवाल यांच्या संकल्पनेतुन सार्वजनिक आणि घरगूती गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी फ़िरते विसर्जन केंद्र ही सेवा गणेश भक्तांसाठी उपलब्ध करून दिली आहे. 
ह्या फिरते विसर्जन केंद्राच्या संकल्पनेनुसार दीड दिवस, तीन, पाच व अनंत चतुर्थी पर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन गणेश भक्तांना आपल्या घरासमोर करता येणार आहे. यासाठी गणेश भक्तांनी साईकला अकॅडमीच्या फिरते विसर्जन केंद्रात फोन करून कळविणे आवश्यक आहे. गणेश भक्तांनी फोन करून आपला पता दिल्यावर फिरते विसर्जन केंद्रांची गाडी त्या ठिकाणी जाऊन सोशल डीस्टन्सचे व शासनाच्या नियमांचे पालन करून  गाडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीत  गणेश मूर्तीचे वीसर्जन करण्यात येणार असल्याचे कल्पेश अग्रवाल यांनी माहिती देतांना सांगितले. 
तसेच मातीची गणेश मुर्ती असल्यास ती त्वरित विरघळणार  असून  प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती असल्यास ती विरघळण्यास सहा तास लागणार आहेत.  गणेश मुर्ती विसर्जन केलेले टाकीतील हे पाणी झाडांना देण्यात येणार आहे.  ह्या संकल्पनेमुळे  जल प्रदूषण टाळले जाणार असून पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केल्याचे समाधान मिळणार आहे. विशेष म्हणजे  कोरोनाचा संकटांत ह्या संकल्पनेची  उपाययोजना  म्हणून मदत होणार आहे.
तर ह्या सामाजिक उपक्रमाचे गणेश भक्तांनी स्वागत केले असून साईकला अकॅडमीचे अध्यक्ष कल्पेश अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वथरांतून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे. तर ह्या अनोख्या उपक्रमाला गणेश भक्तांचा प्रतिसादही मिळत असून फिरते विसर्जन केंद्राच्या माध्यमातून रवीवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी गणेश भक्तांनी संपर्क करावा असे आवाहनही कल्पेश अग्रवाल यांनी केले आहे.

 645 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.