जिल्ह्यात ‘गंदगी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ

ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात १५ ऑगस्टपर्यंत होणार विविध कार्यक्रम अन् स्पर्धाही

ठाणे : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जिल्ह्यात गंदगीमुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे . नागरिकांना स्वच्छ आरोग्य मिळावे, गावात स्वच्छता टिकून रहावी यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे. शनिवारपासून अभियानाचा प्रारंभ झाला असून या अभियानाचा समारोप १५ ऑगस्टला होईल. या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष  सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे गंदगीमुक्त भारत अभियान देशात राबविले जात आहे. 
त्यानुसार ग्रामसेवक , सरपंचासोबत ई – रात्री चौपाल म्हणजेच बैठक घेऊन अभियानाची माहिती देतील . गावागावांमध्ये सरपंच व ग्रामसेवकांच्या नेतृत्वाखाली सिंगल यूज प्लास्टिकचे संकलन करून त्याची सुरक्षितरीत्या विल्हेवाट लावली जाईल . त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या इमारतीची श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे . ग्रामस्थांना हगणदारीमुक्तीविषयी माहिती देण्यात येणार आहे . गावातील भिंतीवर स्वच्छताविषयक संदेश रंगवण्यात येतील . तसेच प्रत्येक गावात श्रमदानातून वृक्षारोपण करणे , सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी गंदगीमुक्त माझा गाव या विषयावर ऑनलाइन चित्रकला स्पर्धा होईल कोरोना महामारी विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) छायादेवी शिसोदे यांनी दिली.

 747 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.