राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचा शुभारंभ

३१ मे २०२१ पर्यंत पशुसंवर्धन विभाग राबिवणार मोहीम

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम फेज-२चा शुभारंभ आज  जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या  उपस्थितीत  कल्याण तालुक्यातील पशुवैदयकीय दवाखाना खडवली येथे करण्यात आला.
या प्रसंगी विषय समिती सभापती संजय निमसे,  कल्याण तालुका पंचायत समिती  सभापती  अनिता वाकचौरे , उप सभापती रमेश बांगर , पंचायत समिती सदस्य दर्शना जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, डॉ.गोरखनाथ चांदोरे, डाॅ.सुजाता देवरे, डाॅ. मादळे व डाॅ.जयश्री दळवी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हातील देशी गोवंशाचे जतन तसेच उच्च वंशावळीचा जनावरांची पैदास होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकरी व पशुपालक यांना उत्तम प्रतीचे गोधन मिळावे तसेच दुग्ध उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य लाभावे या उद्देशाने कृत्रिम रेतन फेज २  चा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम १ ऑगस्ट पासून ३१ मे २०२१ पर्यंत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक खेडेपाडयात वाडी वस्तीत जाऊन पशुवैदयकीय अधिकारी वाझं तपासणी शिबीरे घेऊन पैदासक्षम गायी म्हशीना औषधोपचार करणार आहेत. यामध्ये मुरा,जाफराबादी, सुरती जातीचे तसेच गायीमध्ये जर्सी,हाॅल्स्टीन फ्रीजीयन,खिलार,डांगी गीर,साहीवाल इत्यादी उच्च वंशावळीचे कृत्रिम रेतन केले जाणार आहे.

 555 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.