लॉकडाउनमुळे नवजात बालकांची वाढणार रोगप्रतिकारक क्षमता

लॉकडाउनचा असाही एक फायदा

ठाणे : मुंबई व लगतच्या शहरांमध्ये म्हणजेच नवी मुंबई, ठाणे, मीरा रोड वसई विरार पालघर येथे डिसेंबर- जानेवारी महिन्यात प्रसूती झालेल्या बालकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढेल असा आत्मविश्वास तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दीपा काला यांनी व्यक्त केला. आज मुंबई व लगतच्या शहरांमध्ये अनेक गर्भवती माता नोकऱ्या व छोटे उद्योग करीत असतात  त्यामुळे प्रसूती झाल्यानंतर अनेक मातांना आपल्या बाळाला तीन महिनेच अंगावरचे दूध पाजता येते कारण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अथवा कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या महिलांना ६ ते ८ महिन्याची रजा मिळत नाही व त्यामुळे अनेक नवजात मुलांना वर्षाच्या आतमध्येच दुसरा आहार सुरु केला जातो. कोरोना संक्रमणाच्या काळात मार्च महिन्यापासून ते आता ऑगस्टपर्यंत लॉकडाउन असल्यामुळे डिसेंबर ते मार्च महिन्यात प्रसूती झालेल्या नवजात बालकांना याचा फायदा झाला असून सलग सहा महिने त्याना अंगावरचे दूध मिळाले आहे. जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ . दीपा काला यांच्या  मार्गदर्शनाखाली  डॉक्टर व नर्सेससाठी आज एक वेबिनार आयोजित केली होती. जागतिक स्तनपान सप्ताहमध्ये तेरणा हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेल्या महिलांना स्तनपानाचे महत्व समजावून सांगितले. *नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमध्ये मार्च ते जुलै महिन्यात साठ हून अधिक महिला प्रसूत झाल्या असून आई व बाळांची प्रकृती उत्तम आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही वार्डमध्ये संगणकाच्या माध्यमातून  म्हणजेच चित्रफ़ित दाखवून मार्गदर्शन केले. या वेबिनार मध्ये बोलताना डॉ. दीपा काला म्हणाल्या, ” *कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे परंतु जशी नाण्याला दुसरी बाजू असते त्याचप्रकारे या कोरोनाकाळात लॉकडाउन झाल्यामुळे प्रसूत झालेल्या मातांना (विशेष करून नोकरी करीत असलेल्या) योग्य रीतीने स्तनपान करता आले कारण आईच्या दुधाची बरोबरी कोणत्याच आहाराशी करता येत नाही,आईच्या दुधात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, हार्मोन्स, संप्ररेके असतात व त्यामुळे वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारापासून त्यांचा बचाव होतो. आईच्या दुधात असलेले काही विशिष्ट घटक हे मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे असतात. आपण कोरोना येण्याआधीचा काळ अभ्यासला असेल तर अनेक मातांना तीन ते चार महिन्याच्या वर आपल्या बाळाला दूध पाजता आले नाही. परंतु लॉकडाउन काळात अनेक प्रसूत महिला या घरी होत्या, काहीजणी वर्क फ्रॉम होम करीत होत्या त्यामुळे नवजात बाळांची आबाळ झाली नाही असे आमच्या निदेर्शनास आले आहे. *बाळाला साधारणपणे एक ते दीड वर्षापर्यंत स्तनपान करणे फार गरजेचे असते परंतु शहरांमध्ये हा कालावधी तीन ते सहा महिने असतो कारण अनेक महिला या नोकरी करीत असतात.”
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्टफीडिंग वीक म्हणजेच जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यामध्ये स्तनपानाचे महत्व जोपासण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले जातात परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे असे कार्यक्रम होऊ शकले नाही परंतु अनेक सरकारी व खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून तसेच वेबिनार व फेसबुक संवादातून अनेक प्रसूत मातांना मार्गदर्शन करण्यात आले.

 350 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.