सर्पमित्रांनी दिले जीवदान, एकाच परिसरात दुसऱ्यांदा या जातीची घोणस सापडल्याने जागेबद्दल वाढले कुतुहल
कल्याण : कल्याण पश्चिमेतील गंधारे परिसरात दुर्मिळ दुतोंडी घोणस प्रजातीचा साप आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. गेल्या दोन दिवसापासून कल्याणात अतिवृष्टी सुरू आहे. नाले, नदी, खाडी तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच मनुष्यवस्ती मध्ये साप निघत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. कल्याण पश्चिमेतील गांधरी परिसरातील रिव्हर्स बिल्डींगच्या गेटजवळ सापाचे पिल्लू गुरुवारी दुपारी २.३० वा. सुमारास डिंपल शहा यांना आढळले त्यांनी तात्काळ वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या टिमला संपर्क केला असता सर्पमित्र निलेश नवसरे व सर्पमित्र प्रेम आहेर यांनी घटनास्थळी जाऊन त्या सापाचा सुखरूप बचाव केला असता ती दोन तोंड असलेली दुर्मिळ घोणस विषारी प्रजातीचा साप असल्याचे निदर्शनास आले.
दुतोंडी साप आढळल्याने नैसर्गिक जीवनाची ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी २० सप्टेंबर २०१९ रोजी गंधारे परिसरात दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस वॉर रेस्क्यू फाउंडेशनच्या टिमने बचाव केल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यावेळी त्या सापाला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे संशोधन कार्यासाठी ताब्यात दिले होते परंतू संशोधन सुरू असताना सदर सापाचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात दुसऱ्यांद या दोन तोंडाच्या घोणस सापाला जिवदान देण्यात सर्पमित्रांना यश मिळाल्याचे वॉररेस्क्यू टिमचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगितले.
गतवर्षी हाफकिन संस्थेचे संशोधन कार्य अपूर्ण राहिले होते दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस सापाचा शास्त्रीय अभ्यास व नव्याने नोंद करून वनविभागांचा आदेश येईपर्यंत यांचा संभाळ करणार आहे. तसेच हे दोन्ही दोन तोंड असलेला दुर्मिळ घोणस साप एकाच परिसरात आढळल्याने त्या जागेबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. या घटनेची जागतीक स्तरावर नोंद करून सरिसृप संशोधन पपत्र ( Reptiles Rescerch Paper) जाहीर करणार असल्याचे वन्यजीव अभ्यासक व वॉर रेस्क्यू टिमचे सचिव सुहास पवार यांनी सांगितले.
तसेच “या दुतोंडी सापाला पशुवैद्यकीय आधिकारी डाँ. रायभोळे यांनी तपासणी करुन प्रकुती ठीक असल्याचे सांगितले असुन उपवन सरंक्षक आधिकारी जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.” याप्रसंगी विशाल कंथारिया, स्वप्निल कांबळे, हितेश करंजगावकर, उपस्थित होते.
565 total views, 2 views today