शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटिल यांचे परीसरातील इतर ग्रामपंचायतींना आवाहन
शहापूर : दळखण ग्रामपंचायतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन विकासाचा मंदिर उभे केले होते परंतु आता स्वतःचे आरोग्य सेवा केंद्र उभे करून त्यावर कळस उभा केला आहे,त्यांच्या या आरोग्य सेवा केंद्राचा उपक्रम प्रशसनीय असून हा पॅटर्न इतर ग्रामपंचयतीने राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभेत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटिल यांनी दळखण येथील आरोग्य सेवा केंद्राचे उदघाटन करतांना जाहिर केले.यावेळी जि.प.अध्यक्षा सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार,माजी आमदार पांडुरंग बरोरा,कृषि सभापती संजय निमसे,ऐएसबीबी संस्थेचे सागर जैन,बिपिन रस्तोगी,सरपंच भगवान मोकाशी व ग्रामसेविका माधवी कदम यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस नागरिकांमध्ये आपल्या आरोग्यबाबत घबराटीचे वातावरण पसरत असल्याने व ग्रामपंचायत हद्दितील नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणीकरिता बाहेर जायला लागू नये या उद्देशाने व नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी दळखण ग्रामपंचयतीचे सरपंच भगवान मोकाशी यांनी सामाजिक संस्था व इतर दानशूर व्यक्तीच्या सहाय्याने ग्रामपंचायतीचे स्वतःचे आरोग्य सेवा केंद्र उभे केले आहे. जिल्ह्यात आरोग्य सेवा केंद्र असलेली दळखण ही पहिली ग्रामपंचायत आहे.गावातच आरोग्य सेवा उपलब्ध करून गावातील नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य सेवा केंद्र सुरु केले असल्याचे सरपंच भगवान मोकाशी यांनी सांगितले.
ह्या आरोग्य सेवा केंद्रात गरोदर मातांचे,लहान मुलांचे लसीकरण,प्रथमोपचार यासाठी आशासेवक उपलब्ध राहणार आहे,गरोदरमाता-किशोरवयीन मुलांची बैठक,पोलिओ डोस, आठवड्यातुन दोन वेळा आजारी रुग्णाची आरोग्य तपासणी,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गन मीटर व ऑक्सिमिटर द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
,अतिगंभीर रुग्णासाठी ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिका एसोशिएशन ऑफ बियांड बाउंड्रीज,मुंबई या संस्थेने दिली आहे.तर आरोग्य सेवा केन्द्रासाठी लक्ष्मण म्हसकर व वैशाली म्हसकर यांनी जमीन दिली आहे.
मोफत तपासणी आणि औषधे
या सेवा केंद्रात दोन बेड, वाफेची मशीन,वाकर,टॉयलेट चेयर,बीपी मशीन,ऑक्सीजन सिलेंडर,वाटर फ़िल्टर या सुविधा उपलब्ध असणार आहेत.महिन्यातुन एकदा आरोग्य तपासणी शिबिर,डोळ्याचे शिबिर,डाईबेटिस चेक अप शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.यासर्वाचे व मेडिसिन मोफत देण्यात येणार आहे
689 total views, 1 views today