मध्यवर्ती बँकांच्या पॅकेजेसमुळे सोन्याचे दर वाढले

अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्याने तसेच अधिक प्रोत्साहनाच्या अपेक्षेमुळे सोन्याने २००० ची पातळी ओलांडली.

मुंबई : जागतिक मध्यवर्ती बँकांकडून पैसा सुलभरित्या उपलब्ध होत असल्याने कमोडिटीज मार्केटवर याचा परिणाम झाला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी प्रथमेश माल्या यांनी सांगितले कि , कोव्हिडच्या साथीमुळे कमोडिटीजच्या मागणीवर होणारा परिणाम सुरूच आहे, याच वेळी बँकांकडून अर्थव्यवस्थांमध्ये पैशांचा ओघ सुरू असल्याने आंतराष्ट्रीय बाजारात मागणी-पुरवठ्याची अभूतपूर्व परिस्थिती दिसून येत आहे

सोने: सोन्याच्या दरात मंगळवारी २ टक्क्यांची वाढ दिसून आली. पिवळ्या धातूची किंमत मंगळवारी व्यापार बंद होताना २०१८.१ प्रति औंस एवढी होती. अमेरिकेकडून अधिक प्रोत्साहनाच्या अपेक्षेमुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे बाजाराचा कल दिसून आला. अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्याने तसेच अधिक प्रोत्साहनाच्या अपेक्षेमुळे सोन्याने २००० ची पातळी ओलांडली. साथीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सहजपणे पैशांचा ओघ येणे, हेदेखील सोन्याच्या दरवाढीमागील आणखी एक प्रमुख कारण आहे.

कच्चे तेल: अमेरिकेने नवीन आर्थिक प्रोत्साहन पॅकेज जाहीर केल्याने तेलाच्या स्थितीला काहीसा आधार मिळाला. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर मंगळवारी १.८४ टक्क्यांनी वाढले व ४१.० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. कोरोना विषाणूची दुसरी लाट येऊनही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील कंपन्यांच्या उत्पादनात वाढ झाल्याने तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. इन्स्टिट्यूट ऑफ सप्लाय मनेजमेंटनुसार, मागील १८ महिन्यांचा काळ लक्षात घेता जुलै २०२० मध्ये अमेरिकी कारखान्यात सर्वाधिक कामकाजाची नोंद झाली. आशिया आणि युरो झोनमधील उत्पादन निर्मितीच्या कामात वाढ झाल्यानेही क्रूड तेलाचे दर वाढले आहे. तथापि, ओपेक आणि सदस्य राष्ट्रांनी आधीच ज्यादा पुरवठ्याच्या भीतीने या महिन्यात १.५ दशलक्ष बॅरलचे उत्पादन कपात केल्याने तेलाच्या नफ्यात मर्यादा आली. या निर्णयामुळे बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

बेस मेटल्स : मंगळवारी एलएमई बेस मेटलच्या समूहात सर्वाधिक नफा अॅल्युमिनिअमला झाला. वाहन क्षेत्रातील सुधारणा आणि चीनकडून वाढती धातूची मागणी यामुळे अॅल्युमिनिअमच्या दरांना आधार मिळाला. तथापि, इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात मागणी वाढत असल्याने अॅल्युमिनिअमच्या व्यापारावर काहीसा परिणाम झाला. मात्र तरीही येत्या काही वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये अॅल्युमिनिअम वापर वाढू शकतो, अशी आशा आहे. अमेरिका, आशिया आणि युरोझोन देशांनी नोंदवलेल्या कारखान्याच्या मजबूत डेटामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. अमेरिकी डॉलर घसरत असल्यानेही बाजारात औद्योगिक धातूंच्या किंमतींना आधार मिळाला.

तांबे: मंगळवारी एलएमईवरील तांब्याचे दर १.२० टक्के वाढून ६४९०.० डॉलर प्रति टनांवर बंद झाले. चीनने सादर केलेल्या उत्साही आर्थिक आकडेवारीमुळे लाल धातूला काहीसा आधार मिळाला.२०२० च्या पहिल्या सहामाहीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांबे उत्पादक देश पेरूने २०.४ टक्के तांब्याचे उत्पादन घसरले. कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आल्याचा अंदाज आहे. चिली आणि पेरूमधील तांब्याच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळेही लाल धातूंच्या किंमतीवर दबाव येऊ शकतो.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.