कल्याणमध्ये पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बाजारपेठ पोलिसांवर साधला निशाणा

कल्याण : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आपला आनंद व्यक्त करण्याकरिता आपल्या घरा समोर भगवा झेंडा, भगवी पताका, प्रभू रामचंद्रांचा फोटो लावण्याची परवानगी कल्याणातील श्रीराम भक्तांनी बाजारपेठ पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र बाजारपेठ पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारत रामचंद्रांचा फोटो जप्त करून एक प्रकारे पोलिसांकडून श्रीराम भक्तांवर दडपशाही केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे.
       आज संपूर्ण जगात आनंदाचा दिवस असतांना, इतक्या वर्षांनी एक महत्त्वाची घटना घडत आहेत. देशाचे पंतप्रधान स्वतः या मंदिराचा शिलान्यास करत असतांना महाराष्ट्र सरकार आणि ठाकरे सरकारचे प्रतिनिधी असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी पारनाका परिसरात प्रभू रामचंद्रांचा फोटो, पताका आणि झेंडा लावण्यास विरोध केला. हि बाब निंदनीय असून आपण या पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.  
 

 356 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.